IITian Baba : प्रयागराज येथील महाकुंभात सोशल मीडियावर चर्चेत आलेले ‘आयआयटीयन बाबा’ (IITian Baba) अभय सिंग ग्रेवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबाबत दावा करण्यात येत आहे. त्यांचा मृतदेह हिसारमधील एका हॉटेलमध्ये सापडला असल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात येत आहे. या पोस्टमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. सोशल मीडियावर करण्यात येत असलेला दावा फेक असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
हिसार पोलिसांचे सोशल मीडिया प्रभारी अमरिंदर सिंग म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी ‘पीएलए’ (PLA) परिसरातील राहत्या घरी राहुल जैन (Rahul Jain) नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या घटनेचा संबंध ‘आयआयटीयन बाबा’ यांच्याशी जोडणे आणि त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये सापडल्याचा दावा करणे, हे पूर्णपणे निराधार आहे. मृत राहुल हे हिसारचेच रहिवासी होते.
अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी नागरिकांना आवाहन केले की, सोशल मीडियावर (Social Media) अशी दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती पसरवू नये. पोलीस अधीक्षकांनी (SP) सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले की, मृत राहुल जैन यांचा प्रसिद्ध ‘महाकुंभ बाबा’ (अभय सिंग) यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. तथ्य पडताळल्याशिवाय कोणतेही व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल न करण्याचे आवाहन हिसार पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
अफवा का पसरली?
हा गोंधळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे राहुल जैन (वय 35) हे आयआयटी रुरकीचे माजी विद्यार्थी होते आणि ते ऑनलाइन कोचिंगही देत असत. आयआयटीशी असलेल्या या संबंधामुळे, सोशल मीडियावर ही बातमी अभय सिंग यांच्या निधनाशी संबंधित असल्याचे चुकीच्या पद्धतीने पसरवली गेली. ‘बेडरूममध्ये मृतदेह सापडला’ अशा मथळ्यांसह सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल करण्यात आली होती.
Hisar, Haryana: On reports of IIT Baba (Abhay Singh)’s body being found, Hisar Police social media in-charge Amarinder Singh says, “Around three days ago, the body of a man named Rahul Jain, a resident of Hisar, was found at his house in the PLA area. Following this, misleading reports are being circulated on social media claiming that the body of IIT Baba was found in a bedroom. This news is completely false. We urge the public not to spread or make such misleading news viral…”
— IANS (@ians_india) October 14, 2026
मूळचे झज्जरचे रहिवासी असलेले अभय सिंग ग्रेवाल यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेतले होते आणि कॅनडा व इतर ठिकाणी नोकरी केल्यानंतर ते ‘बाबा’ बनले. महाकुंभादरम्यान ते यापूर्वी चर्चेत आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी हिमाचल प्रदेशातील अंजनघर महादेव मंदिरात कर्नाटकातील एका महिलेशी विवाह केला होता.
महायुतीची मैत्रिपूर्ण लढत ठरली; पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला –
अलीकडेच त्यांना मथुरा आणि वृंदावन येथे पाहण्यात आले होते. ते फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर पेजेस चालवतात, जिथे ते आध्यात्मिक प्रवचने देतात. विशेष म्हणजे, त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सप्टेंबरमध्ये आली होती. त्यांनी आपला लूकही पूर्णपणे बदलला असून आपले लांब केस कापले आहेत.
