पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे यावेळी सीतारामन यांनी सांगितले. मोदी सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा आणि अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा सलग आठवा अर्थसंकल्प ठरला आहे. या अर्थसंकल्पात बऱ्याच घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातीलच काही मोठ्या घोषणांचा आढावा आपण इथे घेऊ… (Important things in the budget announced by Nirmala Sitharaman in simple terms…)
12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त :
प्राप्तिकर रचनेत झालेला बदल ही सर्वसामान्य भारतीयांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पातील महत्वाची घोषणा आहे. आता 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. या घोषणेवेळी सीतारामन म्हणाल्या, मोदी सरकारनं लोकांना आयकरात सातत्यानं दिलासा दिला आहे. त्यासाठी आयकराच्या स्लॅबमध्ये सतत बदल केले जात आहेत. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी खासदारांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाले. सर्वांनी बाकं वाजवून स्वागत केलं.
मात्र ज्यांचे उत्पन्न 12 लाखांच्या पुढे गेलेले आहे त्यांना खालील स्लॅबप्रमाणे कर द्यावा लागणार. यातही पगारदार आणि व्यवसायिक असे दोन गट करण्यात आले आहेत. 12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या पगारदार गटातील करदात्यांना 75 हजारांपर्यंतचे ‘स्टॅंडर्ड डिडक्शन’ मिळणार आहे. म्हणजे थेट 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतेच उत्पन्न करमुक्त होणार आहे. तर व्यवसायिक करदात्यांना 44 AD या सेक्शनअंतर्गत 50 रुपयांपर्यंतच्या 50 टक्के स्टँडर्ड डिडक्शन आधीपासूनच मिळते, असे प्रसिद्ध कर सल्लागार आणि सीए दिलीप सातभाई यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितले.
प्राप्तिकर मर्यादेत कसा झाला बदल? सामान्यांना कधी मिळाला दिलासा?
मोदी सरकारने आतापर्यंत करदात्यांना चारवेळा दिलासा दिला आहे. 2005 मध्ये डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने सर्वप्रथम एक लाखांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त केले आहे. त्यानंतर डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारनेच दोन लाखांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त केले. त्यानंतर 2014 साली अडीच लाखांपर्यंत, 2019 मध्ये पाच लाखांपर्यंतचे, 2023 मध्ये सात लाख रूपये आणि आता 2025 मध्ये बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त झाले आहे.
अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा
ज्येष्ठ नागरिकांसाठी कर कपातीची मोठी घोषणा करण्यात आली आहे; त्यांना चार वर्षांसाठी रिटर्न भरता येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करण्यात आली आहे. तसेच आयटीआर आणि टीडीएस मर्यादा वाढवण्यात आली असून, टीडीएस मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मेडिकल विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 10 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयआयटीमध्ये ६५०० जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 3 AI केंद्रे उघडली जातील. याशिवाय 5 वर्षात मेडिकलमध्ये 7500 जागा वाढवण्यात येणार आहेत. एआय शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचे बजेट.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले ?
एमयुटीपी-३ प्रकल्प-1465 कोटी 33 लाख
पुणे मेट्रो-837 कोटी
मुळा मुठा नदी संवर्धन-230 कोटी
रेल्वे प्रशिक्षण संस्था-126 कोटी 60 लाख
मुंबई मेट्रो-1673 कोटी 41 लाख
————————
ग्रामीण दळणवळण- 683 कोटी
अॅग्री बिझनेस नेटवर्क-596 कोटी 57 लाख
लिफ्ट इरिगेशन-186 कोटी 44 लाख
इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी–652 कोटी 52 लाख
आर्थिक क्लस्टर-1094 कोटी 58 लाख
अर्थसंकल्पात शिक्षणावर 8 मोठ्या घोषणा
शेती उत्पादनासाठी केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा
2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त होणार?