मुलगा मराठा म्हणून कारवाई नाही का?, जरांगे पाटलांनी दिल्लीत जाऊन घेतली शौर्यच्या कुटुंबाची भेट

महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असलं की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

News Photo   2025 12 16T144732.865

मुलगा मराठा म्हणून कारवाई नाही का?, जरांगे पाटलांनी दिल्लीत जाऊन घेतली शौर्यच्या कुटुंबाची भेट

मराठा आरक्षण लढ्याचे आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या दिल्लीत आहेत. (Jarange) ते दिल्लीतील शौर्य प्रदीप पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी शौर्य पाटील या विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. तो मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे.

या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, तसंच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसंच मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का? असा संतप्त सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सॉरी, आई…चिठ्ठीत शिक्षिकांची नावं लिहित सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत जीवन संपवलं

न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल. शाह साहेबांना आम्ही सांगतो, मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असलं की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी होता. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य कुटुंबासह नवी दिल्लीतील राजीव नगर परिसरात वास्तव्यास होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता.

मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शाळेतील काही शिक्षिकांकडून मानसिक छळ होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख शौर्यने दीड पानांच्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. या प्रकरणी राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version