Download App

इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक, सहभागी होण्यावरुन मायावतींच्या पक्षात दोन गट

India Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचाली वाढल्या आहेत. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत आणि बैठकांच्या फेरीही सुरू झाल्या आहे. आज दिल्लीत विरोधी पक्ष्यांच्या इंडिया आघाडीची (India Aghadi) महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी भाग घेतला. मात्र इंडिया आघाडीत सामील होण्यावरुन मयावतीच्या (Mayawati) बसपमध्ये मतभेद असल्याचे समोर आहे.

बसप खासदार श्याम सिंह यादव यांनी सांगितले की, तुम्ही मला विचाराल तर मी अगदी स्पष्टपणे सांगेन की माझ्या पक्षानेही इंडिया आघाडीत सामील व्हावे. हे माझे वैयक्तिक मत आहे. पण बसपा सुप्रिमो त्यांना वाटेल ते करतील, आम्ही त्यांच्या निर्णयाला बांधील आहोत.

बसपा इंडिया आघाडीचा भाग असावा
श्याम सिंह यादव पुढे म्हणाले की, बसपने इंडिया आघाडीचा भाग व्हावा, हे माझे वैयक्तिक मत आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास (उत्तर प्रदेशात) आपण चांगली लढत देऊ शकू यात शंका नाही. दरम्यान, बसपा सुप्रीमो मायावती यांनी आधीच स्पष्ट केले आहे की लोकसभा निवडणुकीत त्या एनडीए किंवा इंडिया यापैकी एकाही आघाडीत सामील होणार नाहीत. बसपा एकट्याने निवडणूक लढवणार आहे.

‘फेब्रुवारीत आचारसंहिता लागेल, तुम्ही परवाच अध्यादेश काढा’; चव्हाणांचं CM शिंदेंच्या भूमिकेवर बोट

जागावाटपाबाबत चर्चा
‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) या विरोधी पक्षाच्या आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागावाटप निश्चित केले जावे, असा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधानपदासाठीच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही या बैठकीत ठरले.

सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग

तथापि, एमडीएमके नेते वायको यांनी सांगितले की, बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून दलित चेहरा म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या बैठकीला एकूण 28 पक्षांचे नेते उपस्थित होते.

Tags

follow us