सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग

सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग

Sukhdev Gogamedi Murder Case : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Gogamedi) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा हात असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणामागे नक्की कोणाचा हात आहे? हे शोधण्यासाठी राजस्थान गृह मंत्रालयाकडून गोगामेडींच्या हत्येचा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनंतर आता NIA कडून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.

Eknath Khadase : महाजन डिस्टर्ब झाले आहेत; ‘ते’ फोटो समोर आणल्यानंतर खडसेंचा पुन्हा निशाणा

गोगामेडी हत्याकांड प्रकरण संबंधी लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य रोहित गोदारा याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये रोहित गोदारा म्हणाला, राम-राम भाई मी रोहित गोदारा. सुखदेव गोगामेडींची हत्या झाली. या हत्येची पूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत. ही हत्या आम्हीच केली आहे. सुखदेव गोगामेडी आमच्या शत्रूंना मदत करत होता. उरली गोष्ट शत्रूंची त्यांनी आपल्या घराच्या चौकटीवर तिरडी तयार करुन ठेवा कारण त्यांच्याशीही लवकरच आमची भेट होणार आहे” अशी पोस्ट रोहित गोदाराने केली होती.

Government Schemes : कुसुम सोलर पंप योजना आहे तरी काय? लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा रोहीत गोदारा हा बिकानेर जिल्ह्यातील लुंकरनसार येथील रहिवासी आहे. 2010 पासून ते गुन्हेगारी जगतात सक्रिय आहेत. सुरुवातील छोटे छोटे गुन्हे केल्यानंतर तो लॉरेन्सच्या संपर्कात आला, त्यानंतर तो त्याच्या टोळीत सामील झाला. पोलिसांनी त्यांच्याविरोधात फिल्डिंग लावल्यानंतर रोहितने दिल्लीतून बनावट पासपोर्ट बनवला आणि 2022 मध्ये दुबईला पळून गेला. तेथून तो सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून टोळीतील सदस्यांशी संपर्कात राहतो. परदेशात बसलेल्या आपल्या पोरांना तो सुपारी देतो.

सुखदेव सिंह गोगामेडीवर गोळ्या झाडणाऱ्या दोन शूटर्ससह तीन लोकांना चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा व्यक्ती तो आहे ज्याने दोन्ही शूटर्सना गोळीबारानंतर पळून जाण्यास मदत केली. पाच दिवस पोलिसांना गुंगारा देणारे शूटर्स चार राज्यांत फिरले. मात्र, असा एक फोटो समोर आला ज्यामुळे त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांच्या हवाल्याने हा फोटो समोर आला आहे. ज्याच्या मदतीने पोलिसांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढले.

राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोगामेडी यांच्यासह इतर दोघांवर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून सुखदेव सिंह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होती. याचदरम्यान अज्ञात दुचाकीवर येत त्यांनी हल्ला केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube