बिहारमध्ये इंडिया गठबंधनने मोठी घोषणा केली आहे. (Bihar) इंडिया गठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीची बिहारमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेहलोत यांनी नुकतीच राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बिहारच्या उभारणीसाठी आपल्याला काम करावे लागेल. लालू प्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सर्व महाआघाडीतील भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. एनडीएवर निशाणा साधत ते म्हणाले, हे लोक थकले आहेत, ते फक्त सत्तेसाठी भुकेले आहेत. जर आपल्याला ३० महिन्यांची संधी मिळाली तर आपण ३० वर्षांत त्यांनी जे केले नाही ते पूर्ण करू असंही तेजस्वी यादव म्हणाले आहेत.
बिहार विधानसभा निवडणूक! नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का?, भाजपच्या डोक्यात काय? वाचा सविस्तर
देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करणे महत्त्वाचे आहे. देश कुठे चालला आहे हे कोणालाही माहिती नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. या काळात देशाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकरी, कामगार, सामान्य लोक, विद्यार्थी आणि तरुणांसाठीही अशीच परिस्थिती आहे. जेव्हा असे घडते तेव्हा लोकांना बदल हवा असतो आणि यावेळीही बदल घडेल. जनतेने कसा प्रतिसाद दिला हे संपूर्ण देशाने पाहिले असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून महाआघाडीत तणाव निर्माण झाला होता. तथापि, अशोक गेहलोत बुधवारी पाटण्याला पोहोचले आणि त्यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी सांगितलं की युती एकजूट आहे आणि निवडणुकीसाठी सज्ज आहे. त्याचबरोबर मुकेश साहनी हे उपमुख्यमंत्री चेहरा असतील अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.