Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) इंडिया आघाडीला (India Alliance) 233 जागा मिळाल्यानंतर आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शिवाय, समविचारी पक्षांना बरोबर येण्याचं निमंत्रण, आपले संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या बैठकीत ठरलं.
महायुतीत धुसफूस! सर्व्हेमुळे उमेदवार बदलले अन् फटका बसला..; शिरसाटांचा रोख कुणाकडे
इंडिया आघाडीची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींसह राष्ट्रवादीचे शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (उद्धव गट) संजय राऊत, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, आप नेते राघव चढ्ढा, सीपीआयचे (एम) नेते सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. सुमारे दीड तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
त्यानंतर माध्यमांशी बोलतांना खर्गे म्हणाले- आमच्या आघाडीला मोठा पाठिंबा मिळाला आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात जनतेने जनादेश दिला आहे. लोकांनी केवळ संविधान वाचवण्यासाठीच नाही तर महागाई, बेरोजगारी आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदान केले. इंडिया आघाडी मोदींच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट शक्तींविरुद्ध लढत राहील.आम्ही जी काही आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असंही खर्गे म्हणाले.
बहुमत न मिळणं हा मोदींचा पराभवच
पुढं बोलतांना ते म्हणाले की, निवडणुकीत जनमत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. निवडणुका त्यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर लढवली गेली. मात्र, जनतेने भाजपला आणि मोदींना बहुमत न देता नाकारलं. हा केवळ मोदींचा राजकीयच नाही तर नैतिक पराभवही आहे. पण, हे जनतम जनमत नाकारण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतील.
दभारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेवर अतूट विश्वास असलेल्या आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाच्या उद्दिष्टांसाठी कटिबद्ध असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे इंडिया अलायन्स स्वागत करते, असंही ते म्हणाले.