Download App

Defence Deal : शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून घातक ड्रोन खरेदी…

Defence Deal : सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रीडेटर MQ-9B रीपर ड्रोन भारत खरेदी करणार असल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सने भारताचा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून भारत एकूण 30 ड्रोन खरेदी करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

महाभयंकर ‘बिपरजॉय’ गुजरातच्या विध्वंसानंतर आता राजस्थानमध्ये धडकणार…

भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये कायमच चकमक सुरु असते. याच पार्श्वभूमीवर शत्रूला धडकी भरवण्यासाठी भारत हे ड्रोन खरेदी करणार आहे. या ड्रोनच्या माध्यमातून शत्रूच्या सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची आवश्यकता होती. त्यासाठी MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. या ड्रोनचा करार हा तीन अब्ज डॉलर्सचा असून करारास भारतीय संरक्षण खात्याने मंजूरी दिली आहे.

Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात सगळी तयारी झालीये; राणेंनी सांगितला भाजपचा इनसाईड प्लॅन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 21 जूनपासून अमेरिका दौरा असणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत मोदींची व्हाईट हाऊसमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ड्रोन खरेदीच्या करारासंदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे.

भारत खरेदी करीत असलेल्या ड्रोनचे दोन प्रकार असून या ड्रोनीची स्काय गार्डीयन म्हणून ओळख आहे. भारताच्या तिन्ही दलासाठी ड्रोनचा सी गार्डीयन प्रकार खरेदी करण्यात आलाय. तर हे ड्रोन सागरी देखरेखीसाठी वापरले जाऊ शकतात, तसेच पाणबुडीविरोधी युद्धासह विविध भूमिका बजावू शकतात.

Tags

follow us