भारत रशियाकडून तेल खरेदी करणार का? ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया

India Responded On Trump Claims : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावा माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

India Responded On Trump Claims

India Responded On Trump Claims

India Responded On Trump Claims : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावा माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करत आहे. पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात अशी टीका लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भारत आपल्या लोकांचा विचार करुन तेल आणि वायू आयात करतो असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांचे देखील खंडन केले आहे.

रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले की, जगात भारत हा तेल आणि वायूचा एक महत्त्वाचा आयतदार आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे प्राधान्य राहिले आहे. आमचे आयात धोरण पूर्णपणे यावर आधारित आहे. स्थिर ऊर्जा किंमती आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे हे आमच्या ऊर्जा धोरणाचे दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. याअंतर्गत, आम्ही आमचे ऊर्जा स्त्रोत वाढवत आहोत आणि बाजारातील मागणीनुसार अनेक बदल करत आहोत असं रणधी जयस्वाल म्हणाले.

तर अमेरिकेच्या बाबतीत आम्ही अनेक वर्षांपासून आमची ऊर्जा खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दशकात ही प्रक्रिया सातत्याने पुढे सरकली आहे.सध्याच्या अमेरिकन सरकारने भारतासोबत ऊर्जा सहकार्य मजबूत करण्यास रस दाखवला आहे आणि या विषयावर चर्चा सुरु आहेत अशी देखील माहिती रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी घाबरतात…, ट्रम्प यांच्या दाव्यावर 5 कारण देत राहुल गांधींचा हल्लाबोल 

नेमकं काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प ?

माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी असा दावा केला की, पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिले होते की भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. भारत रशियाकडून (Russia) तेल खरेदी करणार नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत नाही, परंतु रशियासोबत सुरु असलेला तेल व्यापार तात्काळ थांबवणे सोपे नाही, यात एक प्रक्रिया समाविष्ट आहे जी पूर्ण होण्यास वेळ लागेल असं माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे.

Exit mobile version