India- Pakistan War : सीमेवर तणाव कमी करण्यासाठी काम करत राहण्यावर भारत-पाकिस्तान डीजीएमओ (India-Pakistan DGMO) यांच्यात झालेल्या चर्चेत दोन्ही देशांकडून सहमती दर्शवण्यात आली आहे. याबाबात भारतीय लष्कराकडून (Indian Army) माहिती देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील शेवटची चर्चा 12 मे रोजी झाली होती. यात सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी युद्धबंदी स्थापित करण्याचा करार करण्यात आला होता.
या बैठकीत पाकिस्तानने सीमेपलीकडून एकही गोळी झाडणार नाही अशी ग्वाही दिली होती. तर आज झालेल्या चर्चेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी सीमा आणि पुढच्या भागातून सैन्याची संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजनांचा विचार करावा यावर सहमती झाली असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. दोन्ही बाजूंकडून होणारा गोळीबार आणि हवाई हल्ले थांबल्यानंतर झालेला हा संवाद खूप महत्त्वाचा होता.
पाकिस्तानने दिला होता युद्धबंदीचा प्रस्ताव
10 मे 2025 रोजी पाकिस्तानने भारतासमोर युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता जो भारताने स्वत:च्या अटींवर स्वीकारला. भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानसोबतच्या या लष्करी स्तरावरील चर्चेत भाग घेतला. पाकिस्तानचे प्रतिनिधित्व त्यांचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांनी केले.
पूर्ण ताकदीने लढणार, पालिका निवडणुकीसाठी MIM चा मोठा निर्णय
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवत बदला घेतला होता. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते.