पूर्ण ताकदीने लढणार, पालिका निवडणुकीसाठी MIM चा मोठा निर्णय

पूर्ण ताकदीने लढणार, पालिका निवडणुकीसाठी MIM चा मोठा निर्णय

Imtiaz Jaleel : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Municipal Elections 2025) होणार आहे. सर्वोच्च न्यायालायच्या (Supreme Court) या आदेशानंतर महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (AIMIM) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयम देखील उतरणार असल्याची माहिती माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिली आहे. या निवडणुकीत एमआयएम देखील उतरणार असल्याने निवडणुक तिरंगी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबईत (Mumbai) इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यामांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, आम्ही लवकरच पक्ष सदस्यचा मोहिम राबवणार आहे. फक्त महानगर पालिकाच नाही तर सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहे. आज भाजपची (BJP) सोशल मीडिया टीम पैशाने कोणतीही बातमी पसरवते पण आम्ही एमआयएमची देखील एक मजबूत सोशल मीडिया टीम तयार करणार आहे. असं माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले.

तर युतीच्या बाबतीत जिल्हास्तरीय नेत्यांना जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती देखील इम्तियाज जलील यांनी दिली. तर येणाऱ्या काळात एमआयएमकडून अनेक बैठका आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. आम्ही भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष यांच्याशी युती करणार नाही, असेही यावेळी इम्तियाज जलील यांनी माहिती दिली.

माझे सांडलेले रक्त कारणी लागले…, हेरंब कुलकर्णीकडून शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत 

तर दुसरीकडे भाजप महायुतीसबोत स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर काँग्रेस देखील महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube