India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ७ मे रोजी भारताच्या मिशन ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानी (Pakistan) जनतेचे मत समोर आलं आहे. गॅलप पाकिस्तानच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, सुमारे २ कोटी लोकांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, जर भारताशी युद्ध झालं तर ते पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा देणार नाहीत. ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पंजाबच्या काही भागात भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर हे सर्वेक्षण करण्यात आलं.
मोठी बातमी! देशाला संबोधित करणार पंतप्रधान मोदी, ऑपरेशन सिंदूरनंतर काय बोलणार?
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये १०० दहशतवाद्यांना ठार केलं. एवढंच, नाही तर ९ ठिकाणी हल्ला करून पाकिस्तानच्या नापाक हेतूंना इशारा देण्यात आला की भारतात कोणत्याही दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा कारवाईनंतर पाकिस्तान सरकारने भारतावर अनेक खोटे आरोपही केलं. तथापि, असं असूनही, पाकिस्तानचे २ कोटींचे बलवान सैन्य त्यांना पाठिंबा देण्यास तयार नाही. खरंतर हेच लोक पाकिस्तानची वास्त परिस्थिती जाणून आहेत.
या लोकांना युद्ध का नको आहे?
भारतासारख्या देशाशी युद्ध करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. पाकिस्तान सध्या कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. जीडीपीपासून ते पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपर्यंत, सर्व काही वाईट स्थितीत आहे. या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट होतं की जनता युद्धाला कंटाळली आहे आणि आता त्यांना आर्थिक स्थिरता आणि शांतता हवी आहे. तसंच, पाकिस्तानी सैन्याने अनेक भागात केलेल्या अत्याचारांमुळे लोक सैन्याला पाठिंबा देऊ इच्छित नाहीत.
शांततेचा पुरस्कार करणारे लोक
या गॅलप सर्वेक्षणात पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, ९३ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना भारतासोबत युद्ध हवं आहे. तसंच, त्याच सर्वेक्षणात, ७% म्हणजेच सुमारे २ कोटी लोकांचा असा विश्वास आहे की जर भारताशी युद्ध झालं तर ते सैन्याला पाठिंबा देणार नाहीत. हे सर्वेक्षण केवळ एक आकडेवारी नाही तर पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आरसा आहे.
दशकांपासून लष्करी धोरण, दहशतवादाला खतपाणी घालणं आणि आर्थिक गरिबीशी झुंजणाऱ्या पाकिस्तानमध्ये, सामान्य नागरिक आता त्यांचं भविष्य युद्धाच्या आगीत टाकण्यास तयार नाहीत. हेच कारण आहे की मोठ्या संख्येने लोक उघडपणे लष्कराला विरोध करत आहेत आणि भारतासोबत शांततेचा पुरस्कार करत आहेत.