India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रचंड तणावाचं वातावरण झालंय. ऑपरेशन सिंदूर नंतर गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर अयशस्वी हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. (Pakistan) या दरम्यान झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार करत असताना पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.
भारतीय लष्कराने “ऑपरेशन सिंदूर” राबवलं. यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 स्थानांवर हवाई हल्ले करण्यात आलं. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटांच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईत किमान 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं जाहीर केलं आहे.
28 दहशतवाद्यांना कंठस्नान
यानंतर 9 मे 2025 रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
भारताचे पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर
पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही समावेश होता. या कारवायांनंतर भारतीय सैन्याने आता ठोस प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून तीन ते चार महत्त्वाच्या हवाई तळांवर जोरदार हल्ले केले. या कारवाईत रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तळ हे मुख्य लक्ष्य होतं.