India Mock Drill And Blackout Exercise : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. भारताने (India) पाकिस्तानविरोधात ( Pakistan) कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. आता भारत कधीही पाकवर हल्ला करू शकतो. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिलेत.
Mahadev Jankar : रासप नेत्याने घेतली राहुल गांधींची भेट.., जानकरांच्या डोक्यात नक्की काय?
सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगण्यात येतंय. ७ तारखेला देशभरात मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने तसे आदेश जारी केले आहेत. पोलिस, नागरी संरक्षण संस्था, आरोग्य विभाग आणि इतर आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना सज्ज ठेवण्याचे केंद्राने राज्यांना निर्देश देण्यात आलेत. या मॉक ड्रिलमध्ये बॉम्बस्फोट, सशस्त्र हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती अशा विविध परिस्थितींचा समावेश असेल.
Video : राखी सावंतकडून पाकिस्तानचा उदो-उदो; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मनसे आक्रमक
या मॉक ड्रिलमध्ये, निवडक भागांमध्ये हवाई हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनची चाचणी घेतली जाईल. जेणेकरून सार्वजनिक चेतावणी प्रणालीची कार्यक्षमता तपासता येईल. याशिवाय, विद्यार्थ्यांसह नागरिकांना हवाई हल्ले किंवा बॉम्बस्फोटांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल.
मॉक ड्रीलमध्ये काय होणार?
१. हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे.
२. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रशिक्षण देणे.
३. हल्ल्यादरम्यान शहर/परिसर ब्लकआट करणे (लाईट बंद ठेवणे)
४. महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया.
५. हल्ला झाल्यास नागरिकांचे तातडीने स्थलांतर प्रक्रिया आणि त्याचा सराव.
1971 च्या युद्धाआधी मॉक ड्रिल
या आधी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात अशा प्रकारचा मॉक ड्रिल करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच देशपातळीवर अशा व्यापक स्तरावर युद्धजन्य स्थितीचा सराव होणार आहे.
ही मॉक ड्रिल फक्त सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं. युद्धजन्य परिस्थितीत काय करावे याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
फिरोजपूरमध्ये आधीच सराव
४ मे रोजी पंजाबमधील फिरोजपूर कॅम्पमध्ये ३० मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल पार पडला. रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान दिवे बंद ठेवून युद्धाच्या परिस्थितीमध्ये सज्जतेचा आढवा घेण्यात आला.