India Vs Pak : पहलगाम हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर म्हणून काल (दि. 7 मे) रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या एअर स्ट्राइकमध्ये (Air strike अनेक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला असून पाकिस्तान कधीही भारतावर हल्ला करू शकतो. दरम्यान, पाकिस्तानने भारतावर एअर स्ट्राईक केला तर कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो, याची चाचपणी सुरूआहे.
पाकिस्तान पुन्हा हादरलं! लाहोरमध्ये तीन स्फोट, 3 किमीपर्यंत घुमला आवाज; क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा
भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झालीये. पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे, असं म्हणत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतावर कधीही हल्ला होऊ शकतो. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर सर्वाधिक नुकसान हे नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागाचे होईल. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल सुरू झाल्यात. या राज्यांमध्ये लोकांना हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
पंजाब, गुजरात आणि राजस्थानला सर्वाधिक धोका..
भारतात सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांचा विचार केला तर त्यात पंजाब, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. जर पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाल्यास या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो. गेल्या भारत-पाकिस्तान युद्धात या राज्यांना सर्वात जास्त धोका असल्याचे दिसून आलं होतं. भारतातील उर्वरित राज्ये आणि शहरं म्हणजे, दिल्ली, मुंबई आणि पुणे ही सीमारेषेपासून बऱीच दूर आहेत. त्यामुळे या भागात पाकिस्तानकडून हवाई हल्ले होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे.तर पाकिस्तानलाही त्यांचे लष्करी तळ असलेल्या भागांमध्ये भारतीय हल्ल्यांपासून सर्वाधिक धोका आहे.
पाकिस्तान पुन्हा हादरलं! लाहोरमध्ये तीन स्फोट, 3 किमीपर्यंत घुमला आवाज; क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा
युद्ध झाले तर भारतीय सैन्य सीमेवरील पाकिस्तानी लष्कराचे तळ उद्ध्वस्त करेल. पाकिस्तानी लष्कराचे बहुतेक तळ हे पीओके आणि पंजाब प्रांतात आहेत. त्यामुळे हा परिसर युद्धप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देणार…
पाकिस्तानकडून आलेल्या या ईमेलमध्ये आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून देऊ, असं लिहिलंय. या धमकीनंतर सुरक्षा एजन्सींनी तपास सुरू केलाय आणि अहमदाबादमधील स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.