Download App

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाकडे किती क्षेपणास्त्रे?

भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.

  • Written By: Last Updated:

Who has the most missiles : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. अण्वस्त्रे असलेले दोन्ही देश आता समोरासमोर आलेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे, तर पाकिस्तानने शिमला करार (Shimla Agreement) स्थगित करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक ठिकाणी विनाकारण गोळीबार केला. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलंय. परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. दरम्यान, दोन्ही देशांकडे अणु बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Nuclear ballistic missiles) आहेत.

बोलताना भान उरत नाही, त्यांनी असं बोलू नये; पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून म्हस्केंना फडणवीसांनी फटकारले 

भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानने अशी क्षेपणास्त्रे मिळवलीत, ज्यांच्या मदतीने ते भारताच्या जास्तीत जास्त भागांवर हल्ला करू शकतात. तर संपूर्ण पाकिस्तानवर हल्ला करण्याची क्षमता असलेला भारत आता बीजिंग आणि शांघायवरही हल्ला करण्यास सक्षम आहे.

भारत-पाकिस्तान क्षेपणास्त्रांची तुलना

भारताच्या अग्नि आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांमध्ये संपूर्ण पाकिस्तानवर हल्ला करण्याची क्षमता आहे. याशिवाय, पाकिस्तानकडे सध्या अशी संरक्षण प्रणाली नाही ज्याद्वारे ते या क्षेपणास्त्रांना रोखू शकेल. भारत सरकारच्या डीआरडीओने ही क्षेपणास्त्रे तयार केली आहेत. भारताचे पहिले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पृथ्वी आहे, ज्याची चाचणी 1988 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर भारताने अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्रे तयार केली.

तर पाकिस्तानकडे गौरी क्षेपणास्त्र आहे, जे त्यांनी उत्तर कोरियाच्या मदतीने विकसित केले आहे. हे उत्तर कोरियाच्या Nodong क्षेपणास्त्राच्या आधारे तयार करण्यात आले होते. शाहीन क्षेपणास्त्र चीनच्या DF-11 आणि M-11 क्षेपणास्त्रांच्या आधारे विकसित करण्यात आले. असे मानले जाते की चीनने हे तंत्रज्ञान पाकिस्तानला दिले, त्यानंतर पाकिस्तानने ते विकसित केलंय.

भारतीय क्षेपणास्त्रांची रेंज आणि वर्गीकरण

लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या भारतीय पृथ्वी-1 क्षेपणास्त्राची मारा क्षमता 150 किलोमीटर आहे. तर पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची मारा क्षमता 250-350 किलोमीटर आहे, जी हवाई दल वापरते. पृथ्वी-3 ची मारा क्षमता 350 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
अग्नि-1 क्षेपणास्त्राची मारा क्षमता 700 किलोमीटर आहे, तर अग्नि-3 क्षेपणास्त्राची मारा क्षमता 2000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. अग्नि क्षेपणास्त्र अण्वस्त्रे टाकण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि ते लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी डिझाइन केलेले आहे.
अग्नि-4 क्षेपणास्त्राची मारा क्षमता 4000 किलोमीटर आहे, तर अग्नि-5 हे 5000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला असलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याशिवाय, भारत अग्नि-प्राइम, आणि अग्नि-6 ही क्षेपणास्त्रेही बनवत आहे.

पाकिस्तानी क्षेपणास्त्रांची रेंज आणि वर्गीकरण

पाकिस्तानने आता अशी क्षेपणास्त्रे बनवली आहेत जी भारतातील बहुतेक शहरांना लक्ष्य करू शकतात. पाकिस्तानकडे गौरी-1 क्षेपणास्त्र आहे, ज्याची मारा क्षमता सुमारे 1100 किलोमीटर आहे. पाकिस्तानकडे गौरी-2 क्षेपणास्त्र आहे, ज्याची मारा क्षमता 1800 ते 2000 किलोमीटर आहे. याशिवाय पाकिस्तानकडे शाहीन-1, ज्याची मारा क्षमता 750 किलोमीटर आहे, शाहीन-2, ज्याची मारा क्षमता 1500 ते 2000 किलोमीटर आहे. तर शाहीन-3 क्षेपणास्त्राची मारा क्षमता 2750 किलोमीटर आहे.

पेलोड आणि आण्विक क्षमता

भारतीय क्षेपणास्त्रे अणुहल्ला करण्यास सक्षम आहेत. ते 500 ते 1500 किलो अण्वस्त्रे आणि पारंपारिक शस्त्रे वाहून नेऊ शकतात. भारत आता अग्नि-5 वर MIRV (मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल) तैनात करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे एकच क्षेपणास्त्र वेगवेगळ्या लक्ष्यांवर वेगवेगळे मारा करू शकतील. पाकिस्तानची क्षेपणास्त्रे 500-1500 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकतात.

दरम्यान, भारत-पाक युध्द झाले तर अमेरिका, रशिया, आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांसारख्या शक्ती हस्तक्षेप करून हे युद्ध थांबवू शकतात.

follow us