कार्स स्वस्त होणार! युरोपियन युनियनशी करार भारत कारवरील आयात शुल्क 40% पर्यंत कमी करणार

European Union करारांतर्गत भारताने युरोपियन युनियनला आयात शुल्क 40% पर्यंत कमी करण्याचे आश्वासन दिलं. त्यामुळे युरोपियन कार्स स्वस्त होणार

European Union

European Union

India will reduce import duties on cars by up to 40% in agreement with the European Union : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुक्त व्यापार करारावर चर्चा झाली आहे. हा करार आता अंतिम टोक्यात पोहोचला आहे. तर आता लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे युरोप मधून भारतात आयात होणाऱ्या कार्स प्रचंड स्वस्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण या करारांतर्गत भारताने युरोपियन युनियनला आयात शुल्क तब्बल 40% पर्यंत कमी करण्याचे आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आता युरोपियन कार्स स्वस्त होणार आहेत.

आयसीसीच्या इशाऱ्यानंतर टी-20 वर्ल्डकपवर बहिष्कार टाकणाऱ्या पाकचा संघ जाहीर पण बांगलादेशसाठी हातावर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 देशांच्या गटाच्या पंधरा हजार युरो म्हणजे 17,739 डॉलर्सपेक्षा जास्त आयात किंमत असलेल्या कार्सवरील आयात शुल्क तात्काळ कमी करण्यासाठी सहमत दर्शवली आहे. पुढे शुल्क आणखी दहा टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या निर्णयामुळे भारतामध्ये युरोपमधून येणाऱ्या फॉक्सवॅगन, मर्सिडीज बेंज आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या युरोपियन वाहन कंपन्या सहज येऊ शकतील आणि त्यांच्या कार्स भारतीयांना स्वस्त होऊ शकते.

Exit mobile version