Indian Army Shares New Operation Sindoor Video : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. त्याचा एक व्हिडीओ भारतीय सैन्याकडून जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ जारी केला आहे. काय आहे हा व्हिडीओ पाहूयात…
कान्समध्ये मराठी चित्रपटांची चर्चा;’महाराष्ट्र फिल्मसिटी स्टॉल’ला जगभरातील मान्यवरांची भेट
भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडच्या एक्स या सोशल मिडीया साईटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये सैन्यातील जवान म्हणत आहेत की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याने ही सुरूवात झाली. भारतीय आणि भारतीय सैन्याच्या मनात याच्याबद्दल राग नाही लाव्हा होता. डोक्यात एकच विचार सुरू होता. यावेळी असा धडा शिकवू की, त्यांच्या पिढ्यान् पिढ्या लक्षात ठेवतील. ही बदल्याची भावना नाही हा न्याय होता. तसेच या व्हिडीओमध्ये सैन्याने पाकिस्तानवर डागलेल्या क्षपनास्त्रांची देखील फुटेज समोर आले आहेत. 9 मे ला शत्रुने युद्धविरामाच्या नियामांचं उल्लंघन केलं. त्या सर्व कारवायांना भारतीय सैन्याने कडवं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक कारवाई नाही. तर पाकिस्तानसाठी धडा होता. जो त्यांना दशकांपासून मिळणे गरजेचे होते.
Planned, trained & executed.
Justice served.@adgpi@prodefencechan1 pic.twitter.com/Hx42p0nnon
— Western Command – Indian Army (@westerncomd_IA) May 18, 2025
ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का ठेवण्यात आलं?
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष्य केलं होतं. पुरूषांना टार्गेट करून मारण्यात आलं, यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यांच्या पतींना त्यांच्यासमोरचं गोळ्या घालून त्यांना निवडकपणे मारण्यात आले. एका नवविवाहित महिलेच्या पतीला तिच्या समोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. दहशतवाद्यांनी त्या महिलेला सांगितले की, जाऊन मोदींना हे सांग. या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते.
Video : संतोष देशमुखांचा दुसरा पार्ट होता-होता वाचला; आमदार धस परळी प्रकरणावर काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, दहशतवाद्यांच्या आकाला योग्य उत्तर देण्यात येईल. आज भारताने पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी स्वतः या ऑपरेशनला ‘सिंदूर’ असे नाव दिले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. सिंदूर हिंदू धर्माशी देखील संबंधित आहे. दहशतवाद्यांनी महिलांचे सिंदूर नष्ट केले होते, म्हणून या ऑपरेशनला सिंदूर असे नाव देण्यात आले, अशी माहिती मिळतेय.