Indri Brand of Liquor : चार वर्षांपूर्वी हरियाणा येथील पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीजने (Brand) इंद्री नावाच्या ब्रँण्डची दारू तयार केली, जी 2024 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणारी सिंगल माल्ट व्हिस्की बनली आहे, ज्यामुळे आपोआपच या दारूनं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. दारूच्या या भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. ब्रँडने ग्लेनलिव्हेट आणि ग्लेनफिडिच सारख्या प्रतिष्ठित स्कॉच ब्रँडना देखील मागं टाकलं आहे.
आता फक्त अमरुत, आणि पॉल जॉनच नाही तर नव्यानं बाजारात आलेले ब्रँड इंद्री आणि रामपूर या ब्रँडनं देखील बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे, याची जोरदार विक्री सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये इंद्रीने आघाडी घेतली आहे. इंद्रीला सर्वाधिक लोकप्रियता मिळत आहे. विक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
Video : मृत लोकांसोबत चहा पिण्याची संधी मिळाली, निवडणूक आयोगाचे आभार ; राहुल गांधींचा हल्लाबोल
आयडब्लूएसआस ड्रिंक्स मार्केटच्या रिसर्च रिपोर्टनुसार 2024 मध्ये पहिल्यांदाच भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीची विक्री ही स्कॉचपेक्षा अधिक झाली आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे किंमत कमी आणि उच्च गुणवत्ता असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ग्राहक आता स्कॉच ऐवजी Indian Single Malt ला प्राधान्य देत असल्याचंही या रिपोर्टमधून समोर आलं आहे. इंद्रीने विक्रीचं एक नवं रेकॉर्ड बनवलं आहे, जगात सर्वाधिक गतीनं विक्रीत वाढ झालेला ब्रँड अशी नवी ओळख या दारूला मिळाली आहे.
भारतामध्ये दमट वातावरण असतं, त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत बॅरलमध्ये दहा टक्के अधिकच बाष्पीभवन होतं, त्यामुळे भारतीय सिंगल माल्ट्सला 5 ते 8 वर्षांमध्ये ओपन केलं जातं. त्यामुळे सिंगल माल्ट व्हिस्कीला एक विशिष्ट प्रकारची चव येते, तसंच, वेळेची देखील बचत होते. त्याचबरोबर याचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे या दारूच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस या दारूची मागणी वाढत असून, या दारूच्या विक्रीनं नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे.