Download App

कट्टर शत्रूंना धडकी भरविणारी INS Imphal भारतीय नौदलात, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्यासाठी सज्ज

INS Imphal : स्वदेशी बनावटीच्या INS इंफाळला (INS Imphal) आज मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भारतीय नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. या युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात भारताची ताकद आणखी वाढली आहे. आयएनएस इंफाळ चीन आणि पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.

भारतीय नौदलाची ताकद वाढेल
कार्यक्रमात सहभागी होताना राजनाथ सिंह म्हणाले, आयएनएस इंफाळची सर्वात मोठी ताकद म्हणजे ती पूर्णपणे स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे. आयएनएस इंफाळमुळे भारताचे नौदल अधिक शक्तिशाली होईल. या युद्धनौकेला इंफाळ असे नाव देण्याचे कारण ही युद्धनौका ईशान्येचे वैभव दर्शवते.

INS इंफाळ ही विशाखापट्टणम गटात येते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलाने INS इंफाळवरुन सोडले होते. BHEL ने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. याशिवाय अनेक स्टार्ट अप्स देखील त्याच्या निर्मितीतत सहभागी आहेत. INS इंफाळची निर्मिती भारतातील विविध सामग्रीतून केली आहे.

Manoj Jarange : आम्ही सज्ज, तयारीही पूर्ण; जरांगेंनी सांगितलं मुंबईतील उपोषणाचं प्लॅनिंग

भारताला द्वीप देश का म्हटले?
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर भारत हा एक द्वीप देश आहे. ज्योग्राफीचे दोन प्रकार आहेत. एक फिजिकल ज्योग्राफी आणि ह्युमन ज्योग्राफी. पर्वत आणि पठार फिजिकल ज्योग्राफीत येतात. त्याचबरोबर ह्युमन ज्योग्राफीत मानवी समाज आणि सभ्यता येते.

दरम्यान, उत्तरेला हिमालय आणि पश्चिमेला पाकिस्तानच्या प्रतिकूल वर्तनामुळे तिथून आपला व्यापार शक्य नाही. बहुतेक आपला व्यापार समुद्रमार्गे होतो.

ड्रोन हल्ल्यावर संरक्षणमंत्री काय म्हणाले?
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, आजकाल समुद्रातील हालचाल खूप वाढली आहे. भारताच्या वाढत्या सामर्थ्याने काही देशांना ईर्ष्या वाटू लागली आहे. अरबी आणि लाल समुद्रातील जहाजांवर ड्रोन हल्ले भारताने गांभीर्याने घेतले आहेत. भारतीय नौदलाने समुद्रावर निगराणी वाढवली आहे. भारताविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना समुद्राच्या तळातूनही शोधून काढू.

Lok Sabhha : जेवढ्या शिंदेंना तेवढ्याच जागा आम्हाला हव्यात! अजित पवार गटाने मांडली रोखठोक भूमिका

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आयएनएस इंफाळ भारताची वाढती सागरी शक्ती दर्शवते. मला विश्वास आहे की INS IMPHAL इंडो-पॅसिफिक प्रदेशात आमचे “जलमेव यस्य, बलमेव तस्य” म्हणजेच ‘ज्याचे पाणी त्याची ताकद’ या तत्त्वाला अधिक बळकट करेल.

Tags

follow us