Lok Sabhha : जेवढ्या शिंदेंना तेवढ्याच जागा आम्हाला हव्यात! अजित पवार गटाने मांडली रोखठोक भूमिका

Lok Sabhha : जेवढ्या शिंदेंना तेवढ्याच जागा आम्हाला हव्यात! अजित पवार गटाने मांडली रोखठोक भूमिका

मुंबई : जेवढे आमदार शिंदे गटाचे आहेत, तेवढेच आमदार आमचेही आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत समसमान जागा वाटप व्हावे अशी रोखठोक भूमिका मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. जागावाटपासंदर्भात महायुतीची एक बैठक पार पडणार आहे, या बैठकीला अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. (Chhagan Bhujbal, the minister and leader of the Nationalist Congress (Ajit Pawar) group, expressed the position that equal seats should be allocated to the Lok Sabha)

अजित पवार  अन् शिंदे गटाला प्रत्येकी 22 जागा?

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क मांडण्यात आहेत. मात्र एकूण 48 जागांपैकी भाजप 26 जागा लढवणार आहे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी 22 जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दादांनी केंद्राला दरारा दाखवून निर्यातबंदी उठवावी; पवारांच्या भेटीनंतर कोल्हेंचाही बदलला ‘मूड’

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागा वाटपासंदर्भात भाष्य केले होते. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी भाजप 26 जागा लढवणार आहे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी 22 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार गट आणि शिवसेनेच्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली, असे फडणवीस म्हणाले होते.

40 पेक्षा जास्त जागा जिंकू :

दरम्यान, राज्यातील लोकसभेच्या 40 पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देशात सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वारे आहे. जनतेने आता मोदी यांनाच पुन्हा निवडून देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या 40 पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळवेल. काही माध्यमांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीबाबतीमधील सर्व्हे नुकताच जाहीर केला, त्यामध्ये महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत जास्त जागा मिळत असल्याचे चित्र आहे. यावर ते म्हणाले, “कोणताही सर्व्हे आला तरी आम्ही, त्याचा बारकाईने अभ्यास करतो. परंतु, सध्याचे चित्र भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भाजप सर्वाधिक जागा मिळवेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube