रेल्वे प्रवाशांना झटका! तिकीटांच्या दरात वाढ…किती रुपयांनी वाढणार?

रेल्वेच्या नव्या धोरणानुसार तिकीटांच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा झटका बसणार आहे.

Western Railway block: पश्चिम रेल्वेवर सोमवारी चार तासांचा ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Western Railway block: पश्चिम रेल्वेवर सोमवारी चार तासांचा ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व एसी आणि नॉन-एसी एक्सप्रेस, द्वितीय श्रेणीच्या तिकिटांच्या दरात (Indian Railway) वाढ होण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2025 पासून वाढीव तिकीट लागू होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! इराण अन् इस्रायलमध्ये युद्धबंदी; अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

भारतीय रेल्वे एक नवीन धोरण आणणार आहे. या धोरणानुसार नॉन-एसी कोचमध्ये तिकिटाचे दर प्रति किलोमीटर 1 पैसा आणि एसी कोचमध्ये प्रति किलोमीटर 2 पैसे वाढवता येणार आहेत. या वाढीव दराचा परिणाम दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार नसून 500 किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यातून सुट मिळणार आहे. जर तुम्ही 500 किमी पेक्षा जास्त प्रवास केला तर तुम्हाला प्रति किलोमीटर दराने रेल्वे भाड्यात वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

गजाभाऊच्या फटकारानंतर मोहित कंबोज सोशल मीडियावरून गायब? ट्विटर हँडल डिलीट…

500 किमी पेक्षा जास्त अंतरासाठी दुसऱ्या श्रेणीत प्रवास करणाऱ्यांना प्रति किलोमीटर अर्धे पैसे मोजावे लागणार आहेत. एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन-एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर 1 पैसा जास्त मोजावा लागणार आहे. तर एसीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर 2 पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. वाढीव तिकीटांचे दर फक्त लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच लागू असणार आहेत. 500 किमीच्या आत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जुन्या किमतीत तिकिटे मिळणार आहेत. हा बदल फक्त एक्सप्रेस आणि गाड्यांच्या एसी-नॉन एसी कोचमध्ये लागू असणार आहे.

रेल्वे बोर्डाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला असून तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने अद्याप या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच नवीन दर लागू केले जाणार आहेत.

Exit mobile version