Download App

रेल्वे प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर! सणवार प्रवासासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’, 20 टक्के सूट

Indian Railways Round Trip Package : देशभरातील सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची (Indian Railway) मोठी गर्दी होते, ज्यामुळे प्रवास करणे कठीण होतो. या समस्येवर उपाय म्हणून रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘राउंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिव्हल रश’ ही नवी योजना सुरू (Indian Railways Round Trip Package) केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाश्याने येण्याचे आणि जाण्याचे दोन्ही तिकीट (Railway Ticket) एकत्र बुक केल्यास त्याला परत जाताना तिकीटाच्या भाड्यावरील 20 टक्के सूट मिळेल.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचं मोठं विधान, राहुल गांधींच्या आरोपांनंतर केला मोठा खुलासा

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

– प्रवाश्याने येण्याचे अन् जाण्याचे तिकीट एकाच नावाने आणि तपशीलाने बुक करणे आवश्यक आहे.
– दोन्ही तिकीट एका वर्गातील आणि एकाच स्थानकांदरम्यान (O-D Pair) असावेत.
– येणारा तिकीट 13 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यानचा प्रवासासाठी असावा.
– परतीचा तिकीट १७ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानचा प्रवासासाठी असावा.
– येणारं तिकीट आधी बुक करावं, नंतर परतीचं तिकीट ‘कनेक्टिंग जर्नी’ फीचर वापरून बुक होईल.
– परतीच्या तिकीटासाठी अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) लागू होणार नाही.
– तिकीटांमध्ये बदल किंवा रिफंडची सुविधा नाही.
– परतीच्या तिकीटावर इतर सूट, वाउचर, पास किंवा ट्रॅव्हल कूपन लागू नाहीत.
– ही योजना सर्व वर्गांतील आणि ट्रेन्ससाठी लागू असून, स्पेशल ट्रेन्स (Trains on Demand) मध्येही लागू आहे; परंतु Flexi Fare असलेल्या ट्रेन्ससाठी लागू नाही.
– दोन्ही तिकीट ऑनलाइन किंवा तिकीट काउंटरवरून एकाचवेळी बुक करणे आवश्यक आहे.
– चार्ट तयार झाल्यानंतर भाड्यात बदल झाल्यास अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत.

राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम? शरद पवारांच्या खळबळजनक आरोपांवर… CM फडणवीसांनी दिलं उत्तर

योजनेमागील उद्देश:

रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांचे म्हणणे आहे की, या योजनेमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या तारखांवर विभागली जाईल, ज्यामुळे ट्रेन्सचा वापर योग्य रीतीने होईल आणि प्रवाशांना तिकीट मिळणे सोपे होईल. रेल्वे प्रशासनाने यासाठी माध्यमांद्वारे आणि स्थानकांवर मोठ्या प्रमाणात माहिती प्रचाराचीही व्यवस्था केली आहे. ही नवी योजना प्रवाशांच्या प्रवासाला अधिक स्वस्त, सोयीस्कर आणि सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न आहे.

 

follow us