Chandrayan Mission 3 Launched : भारतासाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं आहे. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. ( India’s Ambitious mission Chandrayan Mission 3 Launched)
The Indian Space Research Organisation (ISRO) launches #Chandrayaan3 Moon mission from Satish Dhawan Space Centre in Sriharikota.
Chandrayaan-3 is equipped with a lander, a rover and a propulsion module. It weighs around 3,900 kilograms. pic.twitter.com/F2aCoZRian
— ANI (@ANI) July 14, 2023
…तर गडकरींना भाषण करु देणार नाही; चंद्रकांतदादा असं का म्हणाले? वाचा सविस्तर
त्याअगोदर त्याची रंगीत तालीम घेण्यात आली होती. हे यान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने ही कामगिरी केलेली नाही. प्रक्षेपित झाल्यानंतर ‘चांद्रयान-3’ विविध स्टेप्स पार करत चंद्रावर पोहचणार आहे.
‘चांद्रयान 3’ 45 ते 50 दिवसांत स्टेप्स पूर्ण करणार
प्रक्षेपण झाल्यापासून, लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यापर्यंत, या सर्व स्टेप्स पूर्ण करण्यासाठी सुमारे 45 ते 50 दिवस लागतील. त्या सर्व स्टेप्स कशा असणार पाहू…
पहिल्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ चे प्री-लॉन्च, लॉन्च आणि रॉकेटला अंतराळात नेणे, तसेच त्याला पृथ्वीच्या वेगवेगळेया कक्षांमध्ये समाविष्ट आहे. यावेळी यान पृथ्वीला सहा प्रदक्षिणा घालणार आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ मार्ग बदलतो. ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडते. तर त्याचा प्रत्यक्ष चंद्राकडे (लूनर ट्रान्सफर फेज) जाण्याचा प्रवास सुरू होईल. तिसऱ्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ लूनर ऑर्बिट इन्सर्शन (एलओआई) म्हणजे चंद्राच्या कक्षेत पाठवलं जाईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधी, 133 सहाय्यक प्राध्यापकांची कंत्राटी भरती
चौथ्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ चंद्राच्या पृष्ठभागावर आपली कक्षा हळूहळू 100 किमीपर्यंत वाढवेल. त्यासाठी सात ते आठ ऑर्बिट मॅन्यूवर करेल. पाचव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ चे प्रोपल्शन मॉड्यूल आणि चंद्र मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होतील. साहव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ डी-बूस्ट होईल त्याचा वेग कमी होईल.
सातव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ ची प्री-लॅन्डिंग होईल ज्यामध्ये यानाच्या लॅन्डिंगची तयारी करण्यात येईल. आठव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ प्रत्यक्षात चंद्रावर लॅन्ड होईल. नवव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ चे लॅन्डर आणि रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचतील आणि सामान्य ऑपरेशन सुरू करतील. दहाव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान 3’ जे प्रोपल्शन मॉड्यूल याना पासून वेगळे झाले आहे ते चंद्राच्या 100 किमीच्या कक्षेत परत येईल.