India Space Station : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे (NASA) प्रमुख बिल नेल्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या (ISRO) तज्ञांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारताला अंतराळात स्पेस स्टेशन (India Space Station) बनवण्यासाठी अमेरिका आणि नासा मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या सहकार्यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला (Space exploration) गती मिळणार आहे.
बिल नेल्सन म्हणाले की अमेरिका आणि भारत मिळून पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2024 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवण्याची योजना आखत आहेत. नासा आणि इस्रोचा संयुक्त उपग्रह NISAR पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रक्षेपित होणार आहे.
बिल नेल्सन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. अंतराळ क्षेत्राबाबत दोन्ही देशांमधील संभाव्य करारांवर त्यांनी चर्चा केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, इस्रो नासाच्या हायपरवेलोसिटी इम्पॅक्ट टेस्ट (HVIT) सुविधेमध्ये गगनयान मॉड्यूलची चाचणी करू इच्छित आहे.
‘मोदी महापुरुष, तर मंदिर बनवा’; पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला उपरोधिक सल्ला
गगनयानची चाचणी अमेरिकेत होऊ शकते
या सुविधेमध्ये, गगनयानची मायक्रोमेटिओरॉइड आणि ऑर्बिटल डेब्रिस (MMOD) शी टक्कर होईल. म्हणजे अंतराळात उडणारे छोटे आणि बारीक दगड. जेणेकरून गगनयानचे संरक्षण कवच किती मजबूत आहे, तो अंतराळात काही दिवस घालवू शकतो किंवा नाही हे लक्षात येईल.
भारत आपले अंतराळवीर ठरवेल
बिल नेल्सन म्हणाले की, कोणता भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार हे ठरवणे भारतीय अंतराळ संस्थेचे म्हणजेच इस्रोचे काम असेल. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. यासाठी बिल नेल्सन यांनी जितेंद्र सिंग यांना हा कार्यक्रम पुढे नेण्यास सांगितले जेणेकरून भारतीय अंतराळवीरांना अमेरिकन रॉकेटमध्ये अंतराळ स्थानकावर पाठवता येईल.
सर्वपक्षीय फेवरेट ‘मोपलवारांना’ अखेर हटवले; MSRDC मध्ये तब्बल दशकभरानंतर खांदेपालट
पुढील वर्षाचे टार्गेट स्पेस स्टेशन
NASA 2024 च्या अखेरीस भारतीय अंतराळवीरांसाठी खाजगी अंतराळवीर मोहिमेची तयारी करेल. त्यानंतर बिल नेल्सन म्हणाले की जर भारतीय अंतराळ संस्थेला स्वतःचे स्पेस स्टेशन बनवायचे असेल तर अमेरिका आणि नासा त्यांना यामध्ये मदत करतील. यासाठी आम्ही तडजोड करण्यास तयार आहोत.
भारतीय अंतराळ स्थानकात मदत होईल
बिल नेल्सन म्हणाले की 2040 पर्यंत भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असेल. हे एक व्यावसायिक अंतराळ स्थानक असेल. भारताची इच्छा असेल तर अमेरिका आणि नासा त्यांना मदत करण्यास पूर्णपणे तयार आहेत. मात्र हा निर्णय भारतालाच घ्यावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक बांधण्याचे आणि 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याचे लक्ष्य दिले आहे.
Uttarkashi Tunnel : “आम्ही फक्त क्रिकेटमध्येच नाही तर…” ऑस्ट्रेलियाच्या PM ना अर्नोल्ड डिस्कचे उत्तर
निसार मिशन पृथ्वीला वाचवेल
NISAR म्हणजेच NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार तयार करण्यासाठी 12,492 कोटी रुपये खर्च आला आहे. ते भारताला देण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीएसएलव्ही रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. हा जगातील पहिला उपग्रह असेल, जो संपूर्ण पृथ्वीवर होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची पहिली माहिती देईल.
इस्रोची सध्या बोईंग, ब्लू ओरिजिन आणि व्हॉयेजर यांसारख्या मोठ्या अमेरिकन अंतराळ कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. जेणेकरून त्यांच्या मदतीने विशेष गरजा पूर्ण करता येतील. तसेच, ते भारतीय खाजगी अवकाश कंपन्या किंवा एजन्सीसोबत एकत्र काम करू शकतात.