Uttarkashi Tunnel : “आम्ही फक्त क्रिकेटमध्येच नाही तर…” ऑस्ट्रेलियाच्या PM ना अर्नोल्ड डिस्कचे उत्तर

Uttarkashi Tunnel : “आम्ही फक्त क्रिकेटमध्येच नाही तर…” ऑस्ट्रेलियाच्या PM ना अर्नोल्ड डिस्कचे उत्तर

Uttarkashi Tunnel : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकून पडलेल्या (Uttarakhand Tunnel Rescue) 41 कामगारांना तब्बल 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. नैसर्गिक संकटांचा (Uttarkashi Tunnel) कोणताही विचार न करता या 41 जीवांना बाहेर काढण्यासाठी हजारो हात झटले. अभियंता असो की सामान्य माणूस, सरकारी यंत्रणा प्रत्येकाचेच यात योगदान राहिले. 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आल्यानंतर कामगारांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या सतरा दिवसात काय वाटलं, अनुभव कसा होता याची माहिती आता कामगार देत असतानाच या घटनेवर आता जगभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथन अल्बानीज यांनी प्रतिक्रिया देत ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्री तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स (Arnold Dix) यांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांच्या या प्रतिक्रियेनवर डिक्स यांनीही उत्तर देत क्रिकेटचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले.

अल्बानीज यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात भारतीय अभियंत्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच या अभियानात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आंतरराष्ट्री सुरुंग तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांचीही पाठ थोपटली. अल्बानीज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, भारतीय अधिकाऱ्यांचं हे मोठं यश आहे. आम्हाला गर्व आहे की ऑस्ट्रेलियाचे प्रोफेसर अर्नोल्ड डिक्स यांनी या कामात महत्वाची भूमिका निभावली.

त्यांच्या या वक्तव्याविषयी प्रसारमाध्यमांनी डिक्स यांना विचारले असता ते म्हणाले, धन्यवाद प्रधानमंत्री.. मला या गोष्टीचा अत्यंत आनंद होत आह की आम्ही फक्त क्रिकेटमध्येच शानदार नाही तर आम्ही अन्य कामेही करतो. ज्यामध्ये सुरुंग बचावाचाही समावेश आहे. 41 लोक आता बाहेर आले आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत. सर्व काही ठिक आहे, असे डिक्स म्हणाले.

Uttarkashi Tunnel मधून मुलाच्या सुटकेची बातमी ऐकण्याआधीच वडिलांचं निधन; कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर

कोण आहेत अर्नोल्ड डिक्स ? 

अर्नोल्ड डिक्स यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये विशेष भूमिका बजावलेली आहे. यामुळे बचावकार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात ते तज्ञ मानले जातात. ते भूमिगत बोगदे आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये तज्ञ आहेत. प्रकल्पाच्या बांधकामापासून ते तांत्रिक बाबींपर्यंत सर्व काही सुरक्षेची काळजी घेत अरनॉल्ड डिक्स यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केले जाते. नैसर्गिक आपत्तींमुळे ओढावलेल्या परिस्थितीत काम करीत असताना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, मोहिमेत असणारे धोके, धोक्यांवर उपाययोजना अशा सर्व गोष्टींवर अर्नोल्ड डिक्स सल्लामसल्लत करीत असतात. त्यांची भूगर्भातील बोगदे तज्ज्ञ म्हणून जगभरात ओळख आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube