Uttarkashi Rescue : ‘अंडरग्राउंड’ एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्स ठरणार 41 मजुरांचे तारणहार
Arnold Dix Played Key Role In Uttarkashi Tunnel Rescue Operation: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर अडकले आहेत. मागील 13 दिवसांपासून मजूर बोगद्यातच अडकून आहेत. मजुरांच्या सुटकेसाठी अंडरग्राऊंड बॅकग्राऊंड एक्सपर्टला बोलवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाहुन अर्नोल्ड डिक्स हे सिलक्यारा ऑपरेशनचं(Silkyara Operation) नेतृत्व करीत आहेत. एका अर्थाने बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांसाठी अर्नोल्ड डिक्स(Arnold dix) तारणहार ठरणार आहेत. अडकलेल्या मजुरांसाठी मोहिम सुरु असून मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही काळ बचावकार्य थांबवावं लागलं आहे. अखेर आज पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात आलं असून सर्व मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात येणार असल्याचं अर्नोल्ड डिक्स यांनी स्पष्ट केलं आहे.
#WATCH | On Silkyara tunnel rescue operation, International Tunneling Expert, Arnold Dix says, “We are only just metres away from finding passage to have the men back. But the men are safe. The auger machine has broken down, it is being repaired and it should be back up tomorrow.… pic.twitter.com/dtX8JtdU61
— ANI (@ANI) November 23, 2023
मजुरांच्या सुटकेसाठी तज्ञ अर्नोल्ड डिक्स यांच्यासह ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL उत्तरकाशी बोगद्याच्या बचाव कार्यासाठी तळ ठोकून आहेत. अर्नोल्ड डिक्स हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. ते आंतरराष्ट्रीय टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अर्नोल्ड डिक्स यांनी आजतागायत अनेक बचाव कार्ये यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्यामुळे उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. 41 मजुरांसाठी तारणहार ठरणारे अर्नोल्ड डिक्स नेमके कोण आहेत, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
Rinku Singh : रिंकूने षटकार खेचला तरीही रन मिळालेच नाहीत; मैदानात नेमकं काय घडलं?
अर्नोल्ड डिक्स यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये विशेष भूमिका बजावलेली आहे. यामुळे बचावकार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात ते तज्ञ मानले जातात. ते भूमिगत बोगदे आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये तज्ञ आहेत. प्रकल्पाच्या बांधकामापासून ते तांत्रिक बाबींपर्यंत सर्व काही सुरक्षेची काळजी घेत अरनॉल्ड डिक्स यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केले जाते. नैसर्गिक आपत्तींमुळे ओढावलेल्या परिस्थितीत काम करीत असताना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, मोहिमेत असणारे धोके, धोक्यांवर उपाययोजना अशा सर्व गोष्टींवर अर्नोल्ड डिक्स सल्लामसल्लत करीत असतात. त्यांची भूगर्भातील बोगदे तज्ञ म्हणून जगभरात ओळख आहे.
उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी 13 दिवसांपासून मशीन्स सतत काम करत आहेत, टीम मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या कामात गुंतलेल्या लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक अडथळ्यांमुळे बचावकार्य मध्यंतरी थांबवावे लागले, मात्र पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. अर्नोल्ड डिक्स घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी बचावकार्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बोगद्याची पाहणी केल्यानंतर अडकलेल्या 41 मजुरांना नक्कीच बाहेर काढले जाणार असल्याचं आश्वासन केलं आहे.