Fact Check : रेल्वेच्या तत्काळ तिकिट नियमांत खरचं बदल झालाय का?; IRCTC ने स्पष्ट केलं

नवी दिल्ली : रेल्वेच्या तत्काळ तिकीट काढण्याच्या नियमांमध्ये येत्या 15 एप्रिलपासून बदल होणार असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या (IRCTC Booking) नियमांमध्ये बदल झाले आहेत का? याबाबत आता स्वतः रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (IRCTC On Tatkal Ticket Booking Viral Message) […]

Fact Check : रेल्वेच्या तत्काळ तिकिट नियमांत खरचं बदल झालाय का?; IRCTC ने स्पष्ट केलं

Fact Check : रेल्वेच्या तत्काळ तिकिट नियमांत खरचं बदल झालाय का?; IRCTC ने स्पष्ट केलं

नवी दिल्ली : रेल्वेच्या तत्काळ तिकीट काढण्याच्या नियमांमध्ये येत्या 15 एप्रिलपासून बदल होणार असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या (IRCTC Booking) नियमांमध्ये बदल झाले आहेत का? याबाबत आता स्वतः रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (IRCTC On Tatkal Ticket Booking Viral Message)

काय सांगता! कमी प्रीमियम मध्येही मिळेल हेल्थ इन्शुरन्स; ‘या’ सोप्या ट्रिक्स ट्राय कराच..

व्हायरल होणारा मेसज काय होता?

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय रेल्वेने तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलली आहे आणि हा नवीन नियम १५ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.

व्हायरल होणारा मेसेज खोटा 

आता व्हायरल होणाऱ्या मेसेजबद्दल रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून, आयआरसीटीसीने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत ११ एप्रिल २०२५ रोजी, आयआरसीटीसीने त्यांच्या अधिकृत @IRCTCofficial एक्स हँडलवरून माहिती दिली आहे. ज्यात एजंट बुकिंग वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचेही आयआरसीटीसीने म्हटले आहे.

Video : दिल्लीत महाराजांचं भव्य स्मारक अन् अपमान करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा; उदयनराजेंनी शाहंसमोर काय काय मागितलं?

सध्याच्या तत्काळ तिकिट बुकिंगच्या वेळा (पूर्वीप्रमाणेच)

एसी क्लास (२ए/३ए/सीसी/ईसी/३ई) सकाळी १०:०० वाजता (प्रवासाच्या एक दिवस आधी)
नॉन-एसी क्लास (SL/FC/2S) सकाळी ११:०० वाजता (प्रवासाच्या एक दिवस आधी)

व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आला होता?

एसी क्लाससाठी तात्काळ बुकिंगची वेळ सकाळी १० वरून ११ वाजता करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नॉन-एसी बुकिंग करण्यात आले आहे. प्रीमियम तत्काळ बुकिंग सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. तर, सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत एजंट बुकिंगवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, व्हायरल होणारे हे सर्व दावे आयआरसीटीसीने फेटाळले आहेत.

Exit mobile version