छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हेरिटेज ट्रेन सुरू होणार; भारतीय रेल्वेचे खास टूर पॅकेज!

Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Heritage Train: देशातील महान व्यक्तींचा इतिहास, एेतिहासिक स्थळे, पर्यटकस्थळे देशातील नागरिकांना माहीत होण्यासाठी भारतीय रेल्वेकडून (Indian Railway)नवनवीन उपक्रम राबविले जातात. आता भारतीय रेल्वेने ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हेरिटेज ट्रेन सुरू केली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Heritage Train) पुढील जून महिन्यात ही ट्रेन सुरू आहे. हेरिटेज ट्रेन सहा दिवस आणि पाच रात्र धावणार आहे.
कामगार दिनीच कामगारांवर काळाचा घाला; बीड जिल्ह्यातल्या देवीनिमगाव रोडवर भीषण अपघात
ही विशेष हेरिटेज ट्रेन नऊ जूनपासून सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात संबंधित ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि स्मारके पाहण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ही ट्रेन सुटेल. त्यानंतर रायगड किल्ला, लाल महाल आणि कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि महालक्ष्मी मंदिर अशी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही ट्रेन जाणार आहे.
मराठी मनोरंजनासाठी एक भक्कम जागतिक व्यासपीठ; उदय सामंतांकडून अभिजात मराठी OTT ची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात रायगड किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालात गेते. हेच त्यांचे निवासस्थान होते. कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख दैवत आहे आणि राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी स्थापित केलेली पहिली गणपती मूर्ती होण्याचा मान देखील त्याला आहे.
प्रतापगड किल्लाही बघायला मिळेल
प्रतापगड किल्ल्याचीही स्वतःची खासियत आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे. 10 नोव्हेंबर 1656 रोजी याच किल्ल्यात शिवाजी आणि अफजखान यांच्यात लढाई झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीला समर्पित एक मंदिर येथे बांधले आहे.
ही खास यात्रा सहा दिवस आणि पाच रात्रींची
ही विशेष हेरिटेज ट्रेन ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ उपक्रमाचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि देशाच्या समृद्ध इतिहासाचे प्रदर्शन करणे आहे. ही खास सहल सहा दिवस आणि पाच रात्रींसाठी आहे. या प्रवासाद्वारे, शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व ऐतिहासिक घटना एकाच वेळी पाहता येणार आहे.
विशेष पॅकेज कितीचे ?
या प्रवासासाठी तीन श्रेणीतील पॅकेज उपलब्ध आहेत. स्लीपर क्लासचे पॅकेज 13 हजार 155 रुपये इतके आहे. ३ एसीचे पॅकेज 19840 रुपये आणि 2 एसीचे पॅकेज 27 हजार 365 रुपये आहे. यामध्ये जेवणही मिळणार आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहप्रवाशासोबत रुम शेअर करावी लागेल, ज्यामुळे किफायतशीर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.