कामगार दिनीच कामगारांवर काळाचा घाला; बीड जिल्ह्यातल्या देवीनिमगाव रोडवर भीषण अपघात

Accident on Devinimgaon-Dhamangaon Road In Beed District : बीडच्या आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव धामणगाव रोडवरून कांदा काढण्यासाठी काल गुरुवार (दि. १ मे) रोजी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअपमधून (Accident) जायला निघाला होता. मात्र, देवीनिमगावच्या सासू-सुना माळावर वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचं नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाल्याची घटना घडली.
यावेळी झालेल्या अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. साधारण १८ ते २० महिला यामधून प्रवास करत होत्या. वाहन उलटल्याने ते रस्त्याच्या कडेला उलटलं. या भीषण अपघातात अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.
मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचार सुरू
जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कामगार दिनाच्या दिवशीची मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याने कडा-आष्टी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी गोंधळाचं वातावरण होतं. पलटी झालेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. कडा शहरापासून जवळ असलेल्या देवीनिमगावच्या सासू-सुना माळावरील खोल ओढ्यात येताच पिकअपचं समोरील टायर फुटल्याचं सांगितलं जात आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मजूरीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला कामावर जातात. या सगळ्या प्रवात आपल्या वाहनांची सर्व चालक मंडळींनी दक्षता घेतली पाहिजे असं पोलीस प्रशासनाने आवाहन केलं आहे.