Indian Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारातील काल गुरूवारी झालेल्या घसरणीशी चीनचा संबंध आहे का? एकाच दिवसात सेन्सेक्स 1770 अंकांनी तर निफ्टी 550 अंकांनी घसरला आहे. (Stock Market) या घसरणीत सर्वात मोठा वाटा परदेशी गुंतवणूकदारांचा आहे ज्यांनी एकाच दिवसात 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
आर्थिक प्रोत्साहन
चीनच्या शेअर बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दीर्घकाळापासून वाढत असलेल्या भारतीय बाजाराऐवजी परदेशी गुंतवणूकदार चिनी शेअर बाजाराकडे वळतील, अशी भीती त्यांना वाटत होती. गेल्या आठवड्यात, चीन सरकारने अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि 5 टक्क्यांपर्यंत आर्थिक विकास दर गाठण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. त्याचवेळी, 1.4 ट्रिलियन डॉलर्सचे मदत पॅकेजही जाहीर केले जाऊ शकते असा अंदाज आहे.
अभिनेते मोहन राज यांच दीर्घ आजाराने निधन; वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज अंतसंस्कार
तज्ज्ञांच्या मते, यामुळे चिनी शेअर बाजारातील शेअर्समध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूकदार चीनकडे वळू शकतात. गेल्या एका आठवड्यात चिनी शेअर बाजार 15 टक्क्यांनी वाढला आहे. अशा परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदार चांगल्या परताव्याच्या दृष्टीने चीनच्या शेअर बाजारात आपली गुंतवणूक वाढवू शकतात. गेल्या आठवड्यात चिनी शेअर बाजारातील वाढीमुळे चीन पुन्हा पुढे सरसावला आहे. मात्र, चीनच्या शेअर बाजारातील वाढीचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं गावकल रिसर्चने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
बुलची तेजी कायम राहणार का?
गवेकल रिसर्चच्या अहवालानुसार, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर उदयोन्मुख बाजारपेठांमधील भांडवलाचा प्रवाह वाढेल. आंतरराष्ट्रीय निर्देशांकात भारताचे वेटेज वाढल्यामुळे गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, चीनचा शेअर बाजार वाढत राहिला तरीही अनेक परदेशी गुंतवणूकदार चिनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून दूर राहतील. चीनची जागतिक डोकेदुखी भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे. अहवालानुसार, परदेशी गुंतवणूकदारांना इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चांगली तेजी दिसत आहे परंतु भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली तेजी संपेल की नाही हे सांगणे फार कठीण आहे.