इस्रायल-हमास युद्धाने कच्च्या तेलाचा भडका, पेट्रोल-डिझेल महागणार

Crude Oil Price : पश्चिम आशियातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. अशा स्थितीत जागतिक तणावाचा वाढता धोका पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा $93 प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 3.36 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 92.92 वर पोहोचली आहे. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर […]

Israel Attack

Israel Attack

Crude Oil Price : पश्चिम आशियातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. अशा स्थितीत जागतिक तणावाचा वाढता धोका पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा $93 प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 3.36 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 92.92 वर पोहोचली आहे.

गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये तणाव वाढत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपूर्ण पश्चिम आशियापासून आखाती देशांमध्ये पसरू शकते, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारताच्या समस्या वाढू शकतात.त्यातील 80 टक्क्यांहून अधिक इंधनाचा वापर कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया 83.27 च्या पातळीवर कमजोर झाला आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने सरकारी तेल कंपन्यांना दुहेरी फटका बसू शकतो. त्यांना कच्चे तेल आयात करण्यासाठी डॉलर्स खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. त्याशिवाय कच्च्या तेलाची खरेदीही महाग होणार आहे.

आमची बाजू ऐकून….; दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल

गेल्या महिन्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 97 डॉलरवर पोहोचला होता. त्यानंतर किंमती 85 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या. परंतु इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या सुरुवातीपासून कच्च्या तेलाच्या किमतींनी यू-टर्न घेतला आणि आता ते प्रति बॅरल $93 च्या जवळ पोहोचले आहेत.

समलैंगिक जोडप्याचा सविनय कायदेभंग; निकालाच्या दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेरच उरकला साखरपुडा

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 550 अंकांनी तर निफ्टी 150 अंकांनी घसरला. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे 2.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. युद्ध अन्य भागात पसरण्याची बाजारात भीती पसरली आहे.

Exit mobile version