शिवशक्ती पॉइंटवर हालचालींना वेग; विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोव्हरसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

नवी दिल्ली : इस्रोने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून इतिहास रचला होता. अशाप्रकारे दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. चंद्रावर एक दिवस 14 दिवसांची असते. ज्यावेळी चंद्रयानचे यशस्वी लँडिंग करण्यात आले त्यावेळी तेथे सूर्योदय होता. मात्र, त्यानंतर रात्र सुरू झाल्याने प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर स्लिपमोडमध्ये टाकण्यात आले होते. […]

Letsupp Image   2023 09 21T132149.041

Letsupp Image 2023 09 21T132149.041

नवी दिल्ली : इस्रोने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून इतिहास रचला होता. अशाप्रकारे दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. चंद्रावर एक दिवस 14 दिवसांची असते. ज्यावेळी चंद्रयानचे यशस्वी लँडिंग करण्यात आले त्यावेळी तेथे सूर्योदय होता. मात्र, त्यानंतर रात्र सुरू झाल्याने प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर स्लिपमोडमध्ये टाकण्यात आले होते. आता पुन्हा 14 दिवसांच्या रात्रीनंतर चंद्रावर उद्या (दि.22) सूर्योदय होणार असून, विक्रम आणि प्रज्ञान सूर्योदयानंतर पुन्हा सक्रिय होण्याची अपेक्षा आहे.

Mla Disqualfication : SC ने कान पिळल्यानंतर नार्वेकरांचा वेग वाढला; ठाकरे-शिंदेंना नोटीस पाठवणार?

सूर्योदय होताच रोव्हर आणि लँडर सक्रीय होणार

चंद्रावर रात्र होण्यास सुरूवात झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला स्लिपमोडमध्ये जवळजवळ ठेवण्यात आले आहे. या दोघांनाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले असून, 14 दिवसांनंतर उद्या ज्यावेळी सूर्योदय होईल त्यावेळी सूर्याची पहिले किरणे सौर पॅनलवर पडतील त्यानंतर दोघेही पुन्हा सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://x.com/NewsIADN/status/1704551645328326949?s=20

काय म्हणाले इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ?

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, लँडर आणि रोव्हर उभे असलेल्या शिवशक्ती पॉईंटवर सूर्योदयानंतर त्याचे पेलोड्स पुन्हा सक्रिय होऊ शकतात. 21 आणि 22 सप्टेंबर रोजी इस्रोची टीम लँडर आणि रोव्हरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल.

https://x.com/isro/status/1696529346872451541?s=20

चांद्रयान-3 ने शोधला खजिना! चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आढळलं

चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आतापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली आहे. चांद्रयान 3 मोहिमेत भारताला चंद्रावर ऑक्सिजन (oxygen) आढळून आलं. प्रज्ञान रोव्हरला संशोधनाच्या वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले.

Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये

चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे. व्हरवर लावलेल्या लेझर ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर घटक असल्याची पुष्टी केली आहे. Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O (ऑक्सिजन) देखील आढळले आहेत.

Exit mobile version