Download App

मराठा अन् धनगर आरक्षणाची चर्चा थेट राष्ट्रपती भवनात! ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली मु्र्मूंची भेट

नवी दिल्ली : राज्यात तापलेला मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर मांडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी आज राष्ट्रपती भवनात मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षण आणि धनगर समाजाची मागणी या प्रश्नांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. (issue of Maratha and Dhangar reservation has been raised directly before President Draupadi Murmu)

राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी समाजाची विरोधी आंदोलने आणि धनगर आरक्षणासाठीची सुरु असलेली उपोषणे या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 31 ऑक्टोबर रोजील पत्र लिहून भेटण्यासाठी वेळ मागितला होता. तसेच मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून आज (18 नोव्हेंबर) सकाळी साडे अकरा वाजताची वेळ दिली होती.

ओबीसींच्या एल्गार सभेकडे पाठ! पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत पंकजा मुंडेंनी सांगितलं ‘इंटर्नल पॉलिटिक्स’

मराठा समाज ओबीसी प्रवर्गात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची मागणी करत आहे. पण ओबीसी समाजाचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध आहे. तर त्याचवेळी धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) दर्जा हवा आहे. 31 ऑक्टोबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न केंद्र सोडवू शकतो, त्यासाठी संसदेचे विशेष अधिकवेश बोलाविण्यात यावे असे म्हटले होते.

Maratha Reservation चा आणखी एक बळी, जरांगेंच्या जालन्यात 14 वर्षे मुलीनं संपवलं जीवन

जरांगेंनी सुरू केला राज्याचा दौरा…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर त्याचवेळी ओबीसी समाजाकडूनही आंदोलने करण्यात येत आहेत. काल जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाची एल्गार सभा पार पडली. ओबीसी समाजाचा सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे.

Tags

follow us