Download App

उपराष्ट्रपती होण्याची इच्छा, दाखल केला उमेदवारी अर्ज; राजस्थानचे जलालुद्दीन आहे तरी कोण?

Vice President Election : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपती

  • Written By: Last Updated:

Vice President Election : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Vice President Election) निवडणूक आयोगाकडून (Election Commission) प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, उपराष्ट्रपती पदासाठी जैसलमेरचे (Jaisalmer) रहिवासी असलेले 38 वर्षीय जलालुद्दीन यांनी 15 हजार रुपयांच्या अनामत रकमेसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर जलालुद्दीन चर्चेचा विषय बनले आहे.

माहितीनुसार, जलालुद्दीन सध्या जयपूरमधील हरिदेव जोशी पत्रकारिता विद्यापीठात शिकत आहेत. जलालुद्दीन (Jalaluddin) यांनी 2009 मध्ये जैसलमेर जिल्ह्यातील असुतार बंधा पंचायतीतून वॉर्ड पंच निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना फक्त एका मताने पराभव पत्करावा लागला होता. यानंतर 2013 मध्ये जैसलमेर विधानसभा मतदारसंघातून आणि 2014 मध्ये बारमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र दोन्ही वेळा त्यांनी अर्ज मागे घेतला होता.

जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून यासाठी नामांनक प्रक्रिया सुरु झाली आहे. 11 ऑगस्ट रोजी जलालुद्दीन यांनी या निवडणुकीसाठी आपला अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केला आहे. मला निवडणूक लढवण्याची आवड आहे. मला माहित आहे की माझा उमेदवारी अर्ज रद्द होईल, परंतु मी अजूनही माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असं माध्यमांशी बोलताना जलालुद्दीन म्हणाले.

तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; मासांहार विक्री बंदीवरुन नवनाथ बन यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

तर दुसरीकडे तांत्रिक त्रुटींमुळे जलालुद्दीन यांचा उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवारी अर्ज देखील रद्द केला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पडताळणी करताना असे आढळून आले की जलालुद्दीन यांनी दिलेली मतदार यादीची प्रमाणित प्रत जुनी होती. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, अशा चुकीमुळे नामांकन आपोआप रद्द होते. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 21 ऑगस्ट शेवटचा दिवस असून निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.

follow us