Kathua Cloudburst : जम्मू काश्मिरातील (Jammu Kashmir) किश्तवाड येथील ढगफुटीची (Kishtwar Cloudburst) घटना अजून ताजी असतानाच आता कठुआमध्येही ढगफुटी (Kathua Cloudburst) झाली आहे. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की यात अनेक घरे अक्षरशः वाहून गेली. रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील राजबाग परिसरातील खोऱ्यात ढगफुटी झाल्यान गावाकडे येणारा रस्ता पूर्ण उद्धवस्त झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचे संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. कठुआ हद्दीतील बागड आणि चांगडा गावे आणि लखनपूर हद्दीतील दिलवान हुतली गावात भूस्खलन झाले. यामध्ये कोणतेही मोठे नुकसान मात्र झाले नाही.
या भागात अतिमुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जलाशयांतील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. येथील नद्यांनी धोक्याची पातळी पार केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. जलाशये नद्या आणि ओढे या ठिकाणांपासून दूर राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की या घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त करण्यात आले. तसेच पीडितांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले.
Kishtwar : किश्तवाड ढगफुटीत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, 200 बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार कठुआत तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी लँडस्लाइड झाले आहे. सध्या चार लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात आणखी वाढ होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या ढगफुटीने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे लोकांचे मोठे नुकसान या नैसर्गिक घटनेने झाल्याचे संकेत मिळत आहेत.
सध्या या भागात पाणी साचले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. रेल्वे ट्रॅक आणि राष्ट्रीय राजमार्ग प्रभावित झाले आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झाले आहे. कठुआ पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरले आहे. यामुळे अनेक अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
किश्तवाडमध्ये गुरुवारी (14 ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली. यात सीआयएसएफच्या दोन जवानांसह 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी ! जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू