Download App

भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली, 21 ठार तर 47 जण गंभीर

म्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी (दि. 30 मे) दुपारी यात्रेकरूंनी भरलेली बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला.

Jammu Kashmir Bus Accident : जम्मूच्या अखनूरमध्ये (Jammu Kashmir)  गुरुवारी (दि. 30 मे) दुपारी यात्रेकरूंनी भरलेली 150 फूट खोल दरीत कोसळली (Bus Accident) . या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला. तर 47 जण जखमी झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हॉरर कॉमेडी अन् स्पाय युनिव्हर्स म्हणजे कलाकाराचं स्वप्न; शर्वरीने व्यक्त केल्या भावना 

सध्या काही जखमींना जम्मूच्या अखनूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

जम्मू-पुंछ महामार्गावर हा अपघात झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सुमारे 90 लोक बसमध्ये प्रवास करत होते.

हॉरर कॉमेडी अन् स्पाय युनिव्हर्स म्हणजे कलाकाराचं स्वप्न; शर्वरीने व्यक्त केल्या भावना 

मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधील सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रहिवासी होते. ही बस भाविकांना घेऊन जम्मूहून शिवखोरी येथे बाबा भोलेनाथाच्या दर्शनासाठी जात होती. मात्र, बस अखनूरच्या तांडा भागात आली असता अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकंना घटनास्थळी धाव घेतली. जखमींना दोरीच्या सहाय्याने वर काढण्यात आले. यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

जम्मूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी बचावकार्य सुरू करून जखमींना अखनूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथील बस अपघाताची बातमी ऐकून दुःख झाले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना व्यक्त करते. तसेच जे प्रवासी जखमी झालेत आहेत, ते लवकर व्हावे, यासाठी प्रार्थान करते, अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली.

दरम्यान, केंद्र सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

 

follow us