कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर
Kurla Bus Accident : मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसने अनेकांना धडक दिल्याने या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 ते 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Kurla Bus) अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर, कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक बंद आहे. दरम्यान, कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. त्यामध्ये बस चालक संजय मोरे हा (दि. १ डिसेंबर) रोजी चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे वय 54 वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता. तसंच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलंही मोठं वाहन चालवलेलं नाही. त्यामुळे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमकं कोण?, पोलीस तपास सुरू आहे.
कुटुंबियांचा वेगळाच दावा?
संजय मोरे हे बस चालक घाटकोपरच्या असल्फा विभागाचा रहिवासी आहे. अनेक वर्षे वाहन चालक म्हणून काम करीत आहेत. लॉकडाऊननंतर बेस्टमध्ये कंत्राटमध्ये ते कामाला लागले. तेव्हा पासून संजय मोरे बेस्टच्या बस चालवतात. ही मोठी इलेक्ट्रीक बस त्यांनी 10 दिवसांपूर्वी चालवयला सुरवात केली होती. त्याची देखील त्यांनी 10 दिवस ट्रेनिंग घेतली होती. संजय मोरे कधीही दारू पिऊन गाडी चालवत नाहीत, बसमध्ये काही तांत्रिक घडले असावे असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तर, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संजय मोरे हा १ डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होत आहे.