मोठी बातमी! गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

मोठी बातमी! गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

Gondia Shivshahi Bus Accident : गोंदियातून एक धक्कादायक बातमी (Gondia Shivshahi Accident) समोर आलीय. गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये आतापर्यंत अकरा व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. घटनास्थळी आता वायुवेगात बचाव कार्य सुरु आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती देखील वर्तवली जात (Bus Accident) आहे.

शिवशाही बस उलटून भीषण दुर्घटना (Gondia Shivshahi Bus Accident) झालीय. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली जात आहे, जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. गोंदीया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत.

ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डव्वा गावाजवळ नागपुरहून गोंदियाकडे शिवशाही बस येत होती. दरम्यान शिवशाही बस उलटली आहे. या अपघातातील 7 ते 8 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. मृतांची संख्या वाढू शकते. घटनास्थळी पोलीस अन् प्रशासन दाखल झालंय. बचावकार्य सुरू आहे.

Waqf Board: सरकारचा मोठा निर्णय! वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर

सडक अर्जुनी इथं शिवशाही बसचा हा भीषण अपघात झालाय. अपघातग्रस्त बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. मृतांचा निश्चित आकडा अद्याप समजलेला नाही. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अपघातात 30 ते 35 लोक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

आज दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान शिवशाही बसचा गोंदियामध्ये अपघात झाला. अचानक दुचाकी समोर आल्यामुळे शिवशाही बसवरील चालकाचा ताबा सुटला. त्याने दुचाकी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु बस उलटली. यामुळे भीषण अपघात झालाय. मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जातेय.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube