मोठी बातमी , बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रिपद सोडलं
Babasaheb Patil : बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे.

Babasaheb Patil : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार त्यांनी तब्येतीचं कारण देत गोंदीयाचे पालकमंत्रिपद सोडले आहे. तर दुसरीकडे इंद्रनील नाईक आता गोंदीयाचे नवे पालकमंत्री असणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्याकक्षांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी काही दिवसापूर्वी नागपूर (Nagpur) येथील पक्षाच्या शिबिरात बोलताना पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतात अशी टीका केली होती. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत इंद्रनील नाईक (Indranil Naik) गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार असल्याची माहिती दिली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी तब्येतीचं कारण देत गोंदीयाचे पालकमंत्रिपद सोडले आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना लांबचा प्रवास करण्यास अडचण येत असल्याने त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कोण आहे बाबासाहेब पाटील
बाबासाहेब पाटील यांची राज्यातील राजकारणात सहकार क्षेत्रातील अनुभवसंपन्न आणि तळागाळातील शेतकरी नेते म्हणून आहे. बाबासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राज्यात सहकार क्षेत्रात नावाजलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर, ता.कराड जि.सातारा या कारखान्याच्या संचालकपदी सन 1992 मध्ये त्यांची निवड झाली. त्यांच्या कामाचा आवाका पाहून सन 1996 मध्ये संचालक मंडळाने त्यांच्या गळ्यामध्ये चेअरमन पदाची माळ घातली, तेव्हापासून आजअखेर ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी कार्यरत आहेत.
Maharashtra Rain Alert : पुढील तीन दिवस राज्यात पुन्हा पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी
या कारखान्याचा उत्कृष्ट आर्थिक नियोजन व उत्तम प्रशासनाचा राज्यात लौकिक असून ऊस उत्पादकांच्या ऊसाला रास्त भाव देण्याची परंपरा आजही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने राखून ठेवली आहे. त्यांच्या मार्गर्शनाखाली कारखान्याने देशपातळीसह राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार मिळविले आहेत.