Kurla Bus Accident: मोठी बातमी ! कुर्ल्यात बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने मोठा अपघात; अनेकांना उडवलं

  • Written By: Published:
Kurla Bus Accident: मोठी बातमी ! कुर्ल्यात बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने मोठा अपघात; अनेकांना उडवलं

Kurla Bus Accident: मुंबईत (Mumbai) अपघाताची मोठी दुर्घटना घडली. कुर्ल्यात एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसने (Best Bus) अनेकांना उडवल्याची माहिती आहे. भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने ही भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक, एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका 

कुर्ल्यातील एलबीएस रोड हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. याच एलबीएस रोडवर हा भीषण अपघात झाला.  बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला. बेस्टच्या बसने मार्केटमध्ये घुसून रिक्षाला चिरडले. रिक्षाचा चक्काचूर झाला. यानंतर बसने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण जखमी झाले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता.

Maharashtra Politics: शिवसेना अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी थेट पुढच्या वर्षी… 

या अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला बाजूला केले आणि बचावकार्य सुरू केले. जखमी आणि मृतांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा हा अपघात झाला. कामावरून लोक घरी जाण्याच्या गडबडीत असतांना बसने होत्याचं नव्हतं केलं.

याबाबत बोलताना आमदार महेश कुडाळकर म्हणाले, मी स्वतः घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जात आहे. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रुग्णांना मदत करणे महत्वाचे आहे. जवळपास 30 जणांना मार लागल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर्व जखमींना महापालिकेच्या बाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube