Maharashtra Politics: शिवसेना अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी थेट पुढच्या वर्षी…

  • Written By: Published:
Maharashtra Politics: शिवसेना अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी थेट पुढच्या वर्षी…

MLA Disqualification Case : गेल्या वर्षी शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटात फूट पडली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार कोसळलं. त्यानंतर अजित पवारांनीही (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडून सत्तेत सहभाग घेतला होता. याप्रकरणी ठाकरे आणि पवारांकडून आमदारांना अपात्र करण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावर निर्णय न झाल्यानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे.

एपी धिल्लन कॉन्सर्ट आयोजित करण्याची प्रेरणा काय? निर्मात्यांनी सांगितली शो उभा करण्याची गोष्ट… 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार, तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल येणं अपेक्षित होत. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदारांना अपात्र केलेलं नव्हतं आणि तातडीने निर्णयही दिलेला नव्हता. त्यामुळे दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुप्रीम कोर्टातही तारखांमागून तारखा पडत होत्या. आता तर चक्क विधानसभेच कार्यकाळ संपवून नवीन विधानसभा अस्तित्वात आली. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीची नवीन तारीख दिली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील वर्षी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक, एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका 

विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमवेत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवले नसल्याने ही याचिका दाखल करण्यात आली होती.

अर्थात या प्रकरणाला आता काही अर्थ उरलेला नाही. कारण ती विधानसभा संपून आता नवी विधानसभा अस्तित्वात आली आहे. तरीही या प्रकरणात पुढं काय होते किंवा न्यायालय दोषी ठरवलेल्यांना काही शिक्षा होऊ शकते का, हे पाहणं देखील महत्वाचं आहे.

17 डिसेंबरला सुनावणी

अजित पवार यांना पक्ष आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली. आता या प्रकरणाची सुनावणी 17 डिसेंबरला होणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube