Jammu Kashmir Election : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Elections) तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात राज्यातील 40 जागांसाठी मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळीच प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात ज्या 40 मतदारसंघात मतदान होत आहे त्यात 24 मतदारसंघ जम्मूतील आहेत. तर 16 मतदारसंघ काश्मीरमधील (Jammu Kashmir) आहेत. जम्मूत भाजपची प्रतिष्ठा पणाला (BJP) लागली आहे. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी यांसारखे राजकीय पक्षच नाही तर रशीद इंजिनियरचा (Rashid Engineer) अवामी इत्तेहाद आणि सज्जाद लोन याचा (Sajjad Lone) पिपुल्स कॉन्फरन्स महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
रशीद इंजिनियरचा पक्षाने उत्तर काश्मीरमध्ये चांगलाच (North Kashmir) दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या पक्षांची राजकीय गणिते बिघडताना दिसत आहेत. तिसऱ्या टप्प्यात काश्मीरमधील ज्या 16 मतदारसंघांत मतदान होत आहे. हे मतदारसंघ बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपुर जिल्ह्यांतील आहेत. उत्तर काश्मीरमधील (North Kashmir) करनाह, त्रेगम, कुपवाडा, लोलब, हंदवाडा, लंगेट, सोपोर, रफियाबाद, उरी, बारामुला, गुलमर्ग, वागोरा – क्रिरी, पट्टन, सोनावारी, बांदिपुरा आणि गुरेज या मतदारसंघांचा समावेश आहे.
जम्मू भागातील 24 मतदारसंघांत उधमपूर पश्चिम, उधमपूर पूर्व, चेनानी, रामनगर, बानी, बिलावर, बसोहली, जसरोटा, कठूआ, हीरानगर, रामगड, सांबा, विजयपूर, बिश्नाह, सुचेतगढ, आरएस पुरा जम्मू साऊथ, बाहू, जम्मू ईस्ट, नगरोटा, जम्मू वेस्ट, जम्मू नॉर्थ, मरह, अखनुर आणि छंब यांचा समावेश आहे.
काश्मिरच्या इलेक्शमध्ये इंजिनिअर राशिदची एन्ट्री! लोकसभेची पुनरावत्ती होणार?
उत्तर काश्मीर परिसरात नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी या राजकीय पक्षांबरोबरच फुटीरवाद्याचाही राजकीय आधार आहे. सज्जाद लोन याचा पिपल्स कॉन्फरन्स आणि रशीद इंजिनियरच्या एआयपी या दोन्ही पक्षांची सुरुवात कुपवाडा जिल्ह्यातूच झाली. याच भागात या दोन्ही नेत्यांचा जनाधार आहे. या निवडणुकीत या दोघांच्या पक्षां बरोबरच अनेक अपक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीत चुरस वाढली आहे.
जम्मू काश्मीरच्या राजकारणात (Jammu Kashmir Politics) पीडीपीचा उदय होण्याआधी उत्तर काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला (National Conference) होता. 2002 मधील विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने या भागातील 9 जागा जिंकल्या होत्या. 2008 मधील निवडणुकीत जागा कमी होऊन ही संख्या सातवर आली. 2014 मधील निवडणुकीत उत्तर काश्मीर भागातील सात जागा जिंकण्यात पीडीपीला यश मिळालं. तर नॅशनल कॉन्फरन्सला फक्त तीन जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत सज्जाद लोनच्या जवळच्या उमेदवारालाही विजय मिळाला.
सज्जाद लोन 2014 मध्ये राजकारणात आला आणि हंदवाडा मतदारसंघातून आमदारकी मिळवली. रशीद इंजिनिअरने 2008 मध्ये काश्मीर प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. कुपवाडा जिल्ह्यातील लंगेट मतदारसंघातून विजय मिळवला. सज्जाद लोन याचा प्रभाव कुपवाडा जिल्ह्यापर्यंत मर्यादित असला तरी रशीद इंजिनियरने उत्तर काश्मीरमधील तिन्ही जिल्ह्यांत आपला दबदबा निर्माण केला आहे. अशात आता उत्तर काश्मीरमधील ज्या मतदारसंघांत मतदान होत आहे तिथं इंजिनिअर फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे.
उत्तर काश्मीर पट्ट्यात जनाधार असलेले सज्जाद लोन आणि रशीद इंजिनियर यांच्यावर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी नेते भाजपचे प्रॉक्सी असल्याचा आरोप केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्ला आणि सज्जाद लोन यांचा रशीद इंजिनियरने पराभव केला होता. सज्जाद लोन यंदा विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून लढत आहे. अशात रशीद इंजिनिअरचा पक्ष त्यांच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे.
Jammu Kashmir : सुरुवातीच्या झटक्यांनंतर भाजप सुस्साट; काँग्रेसनी गमावली सुवर्णसंधी ?
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) रशीद इंजिनियरच्या विजयामुळे येथील सगळीच गणिते बदलली आहेत. बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातील 18 विधानसभा क्षेत्रांपैकी 15 ठिकाणी इंजिनियरला आघाडी मिळाली होती. या निवडणुकीत त्याच्या पक्षाला राजकीय पक्षाचा दर्जा मिळाला नसला तरी त्याचा पक्ष काश्मीरमधील 35 जागांवर निवडणूक लढत आहे. यातील 15 जागा उत्तर काश्मीरमधील आहेत.
सज्जाद लोन आणि रशीद इंजिनियरच्या निवडणुकीतील एन्ट्रीने नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या दोन्ही पक्षांचे टेन्शन वाढले आहे. हे दोघेही फुटीरवादी विचारांतून मुख्य प्रवाहातील राजकारणात आले आहेत. यामुळे त्यांची स्वतः ची राजकीय पकड आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. आता या भागातील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याचं उत्तर मतमोजणीच्या दिवशीच मिळणार आहे.