Jammu Kashmir Encounter News : जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत (Jammu Kashmir) जोरदात धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या भागात चकमक अजूनही सुरू आहे. हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार या गोळीबारात भारतीय सैन्याचा (Indian Army) एक जवान शहीद झाला तर दोन दहशतवादी देखील मारले गेले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार छतरूमधील शिंगपूरा भागात चार अतिरेकी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. याची चाहूल लागताच दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात भारतीय सैन्यानाही गोळीबार सुरू केला. व्हाइट नाइट कोअरने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की आज सकाळी किश्तवाडमधी छतरू भागात पोलिसांबरोबरील संयुक्त अभियानात दहशतवाद्यांशी चकमक उडाली.
या चकमकीत दोन दहशतवाद्यांना मारलं गेलं आहे. उर्वरित दोघांचा शोध घेतला जात आहे. चकमक सकाळपासूनच सुरू आहे. तीन ते चार अतिरेकी असल्याची माहिती समजल्यानंतर किश्तवाड जिल्ह्यातील सिंघपोरा, छतरू भागात सर्च ऑपरेशन राबवले. या अभियानाला ऑपरेशन त्राशी असे नाव देण्यात आले. भारतीय सैन्याच्या व्हाइट कोअरने एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की आज सकाळी चटरू, किश्तवाडमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांसह संयुक्त अभियान राबवले जात असताना अतिरेक्यांशी दोन हात केले.
या मोहिमेत अतिरिक्त जवानांना सहभागी करून घेण्यात आले. अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन अजूनही सुरुच आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि त्यांचे ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि समर्थकांच्या विरुद्ध आक्रमक अभियान सुरू करण्यात आले आहे. 22 एप्रिलनंतर अभियान अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. किश्तवाडमध्ये अतिरेक्यांविरोधात 11 राष्ट्रीय रायफल्स, 7 आसाम रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष मोहीम समूहासह संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.