ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले

ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले

Encounter Between Terrorists And Security Forces In Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir) येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना (Terrorists) घेरले असल्याची माहिती मिळतेय. हे दहशतवादी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. ऑपरेशन सिंदूर नंतर सुरक्षा दलांनी आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले (Encounter Between Terrorists And Security Forces) आहे . काश्मीरच्या अनेक भागात शोध मोहीम सुरू आहे.

नोकरी, प्रेम, पैसा… कोणाच्या नशिबात काय? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य

जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चकमकीची माहिती दिली. काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेरमध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी चकमक सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. ते इतर ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत आणि दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवादी असल्याचं समजतंय.

शोपियानमध्ये तीन दहशतवादी ठार

मंगळवारीही सुरक्षा दलांनी चकमक केली होती. त्यांनी सकाळी शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांना घेरले होते आणि नंतर त्या तिघांनाही ठार मारले. ही कारवाई राष्ट्रीय रायफल्स युनिटने केली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे बरीच प्रगत शस्त्रे सापडली.

पाकिस्तानी एअर सिस्टम 23 मिनिटे टप्प, भारतीय हवाई दलाने असा केला हवाई हल्ला

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान अस्वस्थ

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा भारतात दहशतवादी पाठवले आहेत, पण लष्कराचे जवान त्यांना मारत आहेत. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागातून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा दल संपूर्ण राज्यात दहशतवाद्यांच्या शोधात सतत शोध मोहीम राबवत आहेत . चकमकीत दहशतवाद्यांना ठार मारत आहेत. आता गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube