Download App

जम्मू काश्मीरमध्ये चकमक! दोन जवान शहीद, पाच जण जखमी; एका अतिरेक्याचा खात्मा

मागील नऊ दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आले.

Jammu Kashmir Kulgam Encounter : जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी (Jammu Kashmir Kulgam Encounter) समोर आली आहे. येथील कुलगाममधी अखाल भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत धुमश्चक्री उडाली. मागील नऊ दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आले. सध्या सुरक्षा दल (Indian Army) कुलगाममधील दुर्गम जंगल भागात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. नुकतेच भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव राबवत पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. यानंतरही जम्मू काश्मिरात अतिरेक्यांना हुडकून काढून ठार करण्याचे काम अहोरात्र सुरुच आहे.

आतापर्यंत या चकमकीत एक अतिरेक्याचा मृतदेह हाती लागला आहे. यात दोन जवानही शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागात आणखी तीन अतिरेकी लपून बसले आहेत. या अतिरेक्यांना शोधण्याचं काम सुरू आहे.

अखालच्या जंगल आणि दुर्गम भागात सुरू असलेली ही चकमक आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक असल्याचे सांगितले जात आहे. ही चकमक 1 ऑगस्टपासून सुरू झाली होती. या दिवशी सुरक्षा दलांना या भागात अतिरेकी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या चकमकीत एक अतिरेक्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं आहे. या परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर जोरदार गोळीबार सुरू झाला.

बदमाशांसारखे वागू नका! कायद्याच्या चौकटीतच काम करा, सुप्रीम कोर्टाने ईडीला झाप झाप झापले

जम्मू काश्मीर पोलीस प्रमुख नलीन प्रभात आणि सैन्याचे उत्तरी कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा या ऑपरेशनची निगराणी करत आहेत. अतिरेक्यांना शोधण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. तसेच पॅरा कमांडो देखील या ऑपरेशनमध्ये मदत करत आहेत. चिनार कोरने एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. मागील नऊ दिवसांपासून चकमक सुरू आहे. अतिरेक्यांकडून सैन्यावर जोरदार गोळीबार केला जात आहे. यावरून लक्षात येते की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दारूगोळा आहे.

follow us