Prajwal Revanna Arrested : कर्नाटकमधील जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचा खासदार प्रज्वल रेवण्णा हा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात फरार झाला होता. (Prajwal Revanna) अखेर 34 दिवसानंतर जर्मनीहून भारतात परत आला आहे. दरम्यान, बंगळुरुच्या केम्पोगौडा विमानतळावर येत्याच त्याला एसआयटीने ताब्यात घेत अटक केली आहे. (Prajwal Revanna) रेवण्णा याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. (sexual assault case) तसंच, याबाबतीतील काही व्हिडीओही समोर आले होते. त्यानंतर कर्नाटकचं राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण! माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांची पहिली प्रतिक्रिया
रेवण्णा याच्यावर जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानेही मोठी कारवाई केली आहे. रेवण्णाला पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. रेवण्णा एलएच 0764 फ्लाईटने शुक्रवारी सकाळच्या सुमारास भारतात आला. त्याच्या येण्याची कर्नाटक पोलिसांची एसआयटी टीम वाटच पाहून होती. बेंगळुरु विमानतळावर उतरताच एसआयटी टीमने त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. रेवण्णाने आपण भारतात परतणार असल्याचं यापूर्वीच सांगितलं होतं. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली होती.
या प्रकरणात आता एसआयटीची एक टीम रेवण्णाची आता चौकशी करणार आहे. तसंच, त्याला आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एक दिवसापूर्वी बेंगळुरुतील एका कोर्टाने बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील प्रज्वल रेवण्णाची अंतरिम जामिनाची याचिका फेटाळून लावली होती. रेवण्णा हा जेडी(एस)चे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आहेत.
सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, लवकरच सर्वांना
लैंगिक अत्याचाराचे आरोप लागल्यानंतर सहा दिवसांनी आणि हसन लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर २७ एप्रिल रोजी रेवण्णाने भारत सोडलं होतं. तो जर्मनीला फरार झाला होता. राजनैतिक पासपोर्टच्या सहाय्याने तो पसार झाला होतो. अखेर कुटुंबियांच्या आवाहनानंतर त्याने ३४ दिवसांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला.