British Music Band Coldplay : प्रसिद्ध ब्रिटीश म्युझिक बँड कोल्डप्ले सध्या भारतात आहे. खूप धमाल सुरू आहे. गेल्या वर्षी या बँडच्या ‘इंडिया टूर’ची घोषणा झाल्यापासून भारतात तिकिटांसाठी गर्दी झाली होती. (British Music) या क्रेझची झलक रविवार, २६ जानेवारीला अहमदाबादमध्येही पाहायला मिळाली. या म्युझिक बँडने जवळपास एक लाख प्रेक्षकांच्या गर्दीत एका खास व्यक्तीलाही वेड लावलं होतं आणि तो म्हणजे टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. कोल्डप्लेने बुमराहसाठी एक खास गाणं देखील गायलं.
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार; उपचारांसाठी BCCI न्यूझीलंडला पाठवण्याच्या तयारीत
शनिवार आणि रविवारी, कोल्डप्लेचा कॉन्सर्ट कारवाँ गुजरातमधील अहमदाबाद येथे होता. येथे लाखो चाहते सलग दोन दिवस जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सुपरहिट बँड पाहण्यासाठी आले होते. रविवारी 26 डिसेंबर, प्रजासत्ताक दिनी, चाहत्यांची प्रचंड गर्दी या मैफिलीत पोहोचली, जिथे ‘कोल्डप्ले’ ने प्रत्येक भारतीय चाहत्याला त्यांच्या अनेक सुपरहिट गाण्यांवर नाचायला भाग पाडले.
जसप्रीत बुमराह कॉन्सर्टमध्ये पोहोचला
यापूर्वी मुंबईत झालेल्या कॉन्सर्टमध्ये कोल्डप्लेमुळे बुमराहची खास आठवण झाली होती. पण अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये जेव्हा टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चेहरा स्टेडियममध्ये लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर दिसू लागला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुमराहसोबत त्याची आई आणि मोठी बहीणही उपस्थित होती. चाहत्यांनी बुमराहला पाहताच स्टेडियममधील गोंगाट अनेक पटींनी वाढला.
त्यानंतर बँडचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन यानेही बुमराहसाठी एक खास गाणे गायलं, ज्यामध्ये त्याने बुमराहला त्याचा भाऊ म्हटलं. त्याचवेळी तो म्हणाला की बुमरा जेव्हा इंग्लंडची विकेट घेतो तेव्हा मला चांगलं वाटत नाही. यानंतर लगेचच एक व्हिडिओही प्ले झाला ज्यामध्ये बुमराह इंग्लंडच्या फलंदाजांचे स्टंप उडवत होता. मग काय, बुमराह-बुमराहचे नारे लागले आणि भारतीय स्टार वेगवान गोलंदाजही हसू आवरले नाही.
The ‘game changer’ player is in the house 🔥 turning everything yellow 💛#ColdplayOnHotstar pic.twitter.com/pcXVT3l8L8
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) January 26, 2025