Jharkhand Assembly Result : महाराष्ट्राबरोबरच विधानसभा निवडणूक झालेल्या झारखंडमध्ये (Jharkhand Vidhansabha) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात सत्ताधारी इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांमधील एनडीए यांच्यामध्ये अटीतटीटी लढत दिसत आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 81 जागांपैकी 75 जागांचे कल समोर आले आहे. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 39 जागांवर आघाडी घेतली.
माहिममध्ये ठाकरेंचा शिलेदार पुढे, अमित ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर
राज्यातील 81 जागांवर 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून 68 टक्के मतदान झाले आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 41 आहे.
सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 39 जागांवर आघाडी घेतली. तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीने 36 जागांवर आघाडी घेतली आहे.
काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना धक्का! महायुतीच्या अमोल खताळांची गाडी सुसाट…
झारखंडमध्ये सत्ताधारी इंडिया आघाडीसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. येथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी विरुद्ध भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी यांच्यात मुख्य लढत झाली आहे.
बरहेट मतदारसंघातून मुख्यमंत्री हेमंत सोरेन पुढे आहेत, तर भाजपचे गमलीएल हेमब्रम मागे आहेत. खुंटीमधून भाजपचे दिग्गज आणि पाच वेळा आमदार राहिलेले नीलकंद मुंडा मागे असून झामुमोचे रामसूर्य मुंडा पुढे आहेत.
सीता सोरेन पिछाडीवर
जामतारा येथून मंत्री डॉ. इरफान अन्सारी दुसऱ्या फेरीत 7500 मतांनी पुढे आहेत. भाजप उमेदवार आणि जेएमएमचे प्रमुख शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन पिछाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दुमका येथून त्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.
तर जमशेदपूर पश्चिममधून मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार बन्ना गुप्ता मागे, जेडीयूचे सरयू राय पुढे आहेत. 2019 मध्ये सरयू राय यांनी जमशेदपूर पूर्व येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांचा पराभव केला.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमला 30, काँग्रेसला 16 आणि आरजेडीला एक जागा मिळाली होती. या तिन्ही पक्षांची 2019 ला युती होती. त्यानंतर झामुमोचे नेते हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या.