काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना धक्का! महायुतीच्या अमोल खताळांची गाडी सुसाट…

काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना धक्का! महायुतीच्या अमोल खताळांची गाडी सुसाट…

Assembly Election : संगमनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांना मोठा धक्का बसलायं. बाळासाहेब थोरात 4 हजार मतांनी पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. तर महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी 4 हजार मतांची आघाडी घेतलीयं. संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात हे विद्यमान आमदार असून त्यांना हा मोठा असल्याचं बोललं जात आहे. थोरात हे काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. निकालाबाबत त्यांना माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, हे निकाल आणखी एक-दोन तासांत स्पष्ट होतील, त्यामुळे त्यावर आत्ता काही बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याची पहिली प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिलीयं.

महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी खास ‘प्लॅन’ तयार…

संगमने मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, ऐनवेळी सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली नाही तर अमोल खताळ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मागील अनेक वर्षांपासूनचा विखे-थोरात संघर्ष संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. त्यामुळे लोकसभेला पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी संगमनेरातून विधानसभा लढवण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, अमोल खताळ यांना उमेदवारी मिळाल्याने विखे-थोरात यांच्यातील प्रत्यक्ष लढत रोखली.

‘मविआ’चच सरकार? उद्धव ठाकरे अन् शरद पवारांनी ‘लाईव्ह शस्त्र’ उगारलं, उमेदवारांना कडक सूचना

follow us
  • fb
  • instagram
  • youtube